Janhvi Kapoor: बाई... जान्हवीने फ्लाँट केली फिगर, तुम्हीही म्हणाल हिचा तर कहर!
Janhvi Kapoor Hot Look: जान्हवी कपूरच्या नव्या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पाहा तिचे खास फोटो.
ADVERTISEMENT

Janhvi Kapoor Pics: मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही अभिनयाव्यतिरिक्त तिच्या परफेक्ट फिगर आणि लूकसाठी नेहमी चर्चेत असते. ती वेस्टर्न ड्रेस आणि एनथिक आऊटफिटमध्येही परफेक्ट दिसते. सूट असो किंवा मिडी ड्रेस, तिला लोकांना कसं प्रभावित करायचं हे चांगलंच माहीत आहे
जान्हवी अनेकदा तिच्या चाहत्यांची आवड लक्षात घेऊन फोटो शेअर करत असते. अलीकडेच, जान्हवीने पुन्हा एकदा तिचे काही अतिशय ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लक्झरी इटालियन ब्रँड 'डोल्चे अँड गब्बाना' चा पोशाख परिधान केला आहे.
हे ही वाचा>> Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा कमबॅक करणार, पण बॉलिवूड नाही तर राजामौलींच्या चित्रपटातून...
इटालियन ब्रँडच्या पोशाखात जान्हवीचा जलवा
या ग्लॅमरस फोटोशूटसाठी जान्हवीने D&G ब्रँडचा पांढरा कॉर्सेट टॉप आणि स्कर्ट घालण्याचा पर्याय निवडला. या स्लीव्हलेस कॉर्सेट टॉपवर व्ही-नेकलाइन डिटेलिंग होते, ज्यामुळे त्याला एक ग्लॅमरस टच होता. या कॉर्सेट टॉपला ब्लाउजसारखं पुढच्या बाजूला हुक आहेत. यासोबतच, त्याला जोडलेले टॅसलसुद्धा अधिक सुंदर आहे.
हे ही वाचा>> Nora Fatehi: ट्रेनने रत्नागिरी गाठलं, मराठमोळ्या मित्रासाठी नोरा हळदीतही थिरकली
जान्हवीने पेन्सिल स्कर्टमध्ये फ्लाँट केली फिगर
जान्हवीने तिचा सुंदर कॉर्सेट टॉप पांढऱ्या हाय-वेस्ट स्कर्टसोबत घातला होता, जो तिच्या लूकचा शोस्टॉपर होता. या मिडी-लेंथ पेन्सिल स्कर्टच्या वरच्या बाजूला टॉपसारखेच टॅसल होते, ज्यामुळे तिचा आउटफिट परफेक्ट होता. या पोशाखाची आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे जान्हवी तिचे कर्व्ह्स उत्तम प्रकारे फ्लाँट करू शकत होती. जर तुम्हाला जान्हवीचा हा पोशाख आवडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की त्याची किंमत तब्बल 13,32,348 रुपये आहे.
कमीत कमी दागिने..
जान्हवीने तिचा ग्लॅमरस आणि सुंदर पोशाख कमीत कमी दागिन्यांसह परिधान केला. तिने हा स्कर्ट-टॉप 'डोल्चे अँड गब्बाना' ब्रँड लेबलच्या 'डी अँड सी' या इनिशियल्ससह इयरिंग केले होते. परिपूर्ण फिनिशिंग टच देण्यासाठी अभिनेत्रीने बॅगही घेतली होती.