Nora Fatehi: ट्रेनने रत्नागिरी गाठलं, मराठमोळ्या मित्रासाठी नोरा हळदीतही थिरकली
Nora Fatehi Ratnagiri Haldi: अभिनेत्री नोरा फतेही ही आपल्या सहकाऱ्याच्या हळदी समारंभासाठी खास रत्नागिरीला गेली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नोरा फतेहीने मराठी हळदी समारंभाला लावली हजेरी

थेट रत्नागिरीपर्यंत केला नोराने ट्रेनने प्रवास

नोरा फतेहीने जुन्या सहकाऱ्याच्या हळदी-लग्नात लावली उपस्थिती
Nora Fatehi Ratnagiri: रत्नागिरी: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने पुन्हा एकदा तिच्या हृदयस्पर्शी वागण्याने सर्वांची मने जिंकली आहे. कारण तिने तिच्या मराठमोळ्या सहकाऱ्याच्या हळदी आणि लग्नासाठी थेट कोकणातील रत्नागिरीच गाठलं. नोराने तिच्या सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर केला आहे. (nora fatehi reached ratnagiri by train nora danced at the haldi ceremony for her marathi colleague also attended the wedding)

नोराने स्वत: शेअर केले फोटो आणि व्हीडिओ
या व्लॉगमध्ये नोराने दादर स्टेशन ते रत्नागिरी या ट्रेनच्या प्रवासाची माहिती दिली आहे. तिने आपल्या टीम मेंबरच्या लग्नाला हजेरी लावून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसंच हे लग्नही खूप स्पेशल बनवलं. यावेळी नोराने कोणताही बडेजावपणा दाखवला नाही. यावेळी आपल्या सहकाऱ्यासोबत तिने हळदीत डान्सही केला.
हे ही वाचा>> Prajakta Mali: 'सुरेश धस तुम्ही माझी जाहीर माफी मागा...', प्राजक्ता माळी संतापली!
नोराच्या कारकिर्दीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासूनच तिचा हा सहकारी तिच्यासोबत काम करत आहे. तिचं यश हे कॅमेऱ्याच्या मागे राहून टिपणारा हा तिचा जुना सहकारी आहे. त्यामुळे याच गोष्टीचा आदर राखत नोराने आपल्या सहकाऱ्याच्या आयुष्यतील महत्त्वाचा क्षण अधिक गोड करण्यासाठी स्वत: रत्नागिरीला हजेरी लावली. यावरूनच तिचं तिच्या टीमसोबत असलेलं बाँडिंग देखील दिसून येतं.

व्लॉगमध्ये नोरा नवऱ्या मुलाच्या कुटुंबासोबत हळदी समारंभात डान्स करतानाही दिसली. तिची उपस्थिती आणि तिचा उत्साह यामुळे या हळदी समारंभाची शान आणखीनच वाढली. जणू ती खरोखरच कुटुंबाचा एक भाग बनली होती. स्वत: नोरा गावी आल्याने तिच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा>> Urmila Kothare: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारने दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू
नम्रता आणि कृतज्ञतेचे एक सुंदर उदाहरण म्हणून चाहते नोराच्या व्यावहारिक स्वभावासाठी आणि तिच्या टीमला कुटुंबासारखे वाटण्याची क्षमता याबद्दल तिचे कौतुक करत आहेत.

नोरा तिच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. यो यो हनी सिंगसोबत तिच्या 'पायल' म्युझिक व्हिडिओच्या प्रचंड यशानंतर तिने अलीकडेच करण औजलासोबत 'आये हाये' या हिट म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे.