Sunny Leone : लाडकी बहीणसारखीच छत्तीसगड सरकारची योजना, लाभार्थ्यांमध्ये सनी लिओन, दर महिन्याला किती रुपये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सनी लिओनला महिन्याला किती हजार मिळाले?

point

छत्तीसगड सरकारची योजना नेमकी काय?

लाडकी बहीण आणि त्यासारख्या योजनांचा सध्या देशभरात बोलबाला सुरू आहे. अशातच सनी लिओनलाही एका योजनअंतर्गत 1 हजार रुपये दरमहिन्याला मिळत असल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगड सरकारच्या महतरी वंदन योजनेचा लाभ सनी लिओनलाही मिळत आहे. महतरी वंदन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचं नाव दिसल्यानंतर तिथे मात्र जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. योजनेतून चुकीच्या नावावर निधी वर्ग केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सनी लिओन नावाच्या लाभार्थीच्या खात्यात दरमहा 10000 रुपये पाठवले गेले आहेत.

ADVERTISEMENT


सनी लिओनच्या नावाशी संबंधीत हे प्रकरण छत्तीसगडमधील बस्तर भागातील आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनला बस्तरमध्ये महतरी वंदन योजनेचा लाभ मिळत असल्याचं समोर आलं आहे. शासनाच्या महतरी वंदन योजनेच्या वेबसाईटवर तिचं नाव लाभार्थी म्हणून आहे. वेबसाइटवर नोंदणी क्रमांक MVY006535575 प्रविष्ट केल्यावर, लाभार्थीचं नाव सनी लिओन असं येतंय.  तिच्या पतीचं नाव जॉनी सिन्स असं दिसतंय. योजना सुरू झाल्यापासून या खात्यावर दरमहा 1,000 रुपये जमा केले जात आहेत.

काँग्रेसने सरकारला कोंडीत पकडले

हे ही वाचा >> Kalyan Dombivali : कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीचा विनयभंग केल्यानंतर जाब विचारायला गेलेल्या...
 

खोटी नावं समोर आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्तीसगडच्या माता-भगिनींच्या नावावर महतरी वंदनाच्या नावाखाली सरकार गैरप्रकार करत असून, याची आम्हाला सुरुवातीपासूनच जाणीव होती. कोण आहे ही सनी लिओनी? कोणाच्या खात्यात पैसे जात आहेत? त्याचा सूत्रधार कोण? हा तपासाचा विषय आहे. करीना कपूरच्या नावावरही पैसे खर्च होत आहेत का? याचा सरकारने शोध घ्यावा. महतरी वंदनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळेच अशी प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत असं काँग्रेसने म्हटलं आहे.

भाजपने प्रत्युत्तर दिले

काँग्रेस नेते दीपक बैज याच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले - "छत्तीसगड सरकारची महतरी वंदन योजना हे ऐतिहासिक पाऊल आहे. काँग्रेस घाबरली आहे, त्यामुळेच अशी विधानं केली जात आहेत. बस्तर भागात काही गैरप्रकार घडलेत.अभिनेत्रीच्या नावावर पैसे काढले जात आहेत. याची चौकशी केली जाईल.

हे ही वाचा >> Mohan Bhagwat : "सत्ता हवी होती तेव्हा मंदिरावर बोलले, सत्ता आल्यावर...", मोहन भागवत यांच्या भूमिकेला 2 मोठ्या महंतांचा विरोध

प्रशासन कारवाईत आले

ही बाब लक्षात येताच प्रशासनाने वेबसाइटवरू खऱ्या लाभार्थीचा शोध सुरू केला. हे प्रकरण बस्तर जिल्ह्याच्या तलूर पंचायतीशी संबंधित आहे. बस्तरचे जिल्हाधिकारी हरीश एस म्हणाले की, माहिती मिळताच संबंधित बँक खातं होल्डवर ठेवण्यात आलं आहे. योजनेंतर्गत जाहीर केलेली रक्कम वसूल करण्याबरोबरच या योजनेचा लाभ घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून आता गुन्हे दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT