Chhaava Movie Trailer: 'विक्की'चा रुद्रावतार अन्...! पहिल्याच दिवशी 'छावा'चा ट्रेलर गाजला, धडकी भरवणारा व्हिडीओ पाहिलात का?
गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेला विक्की कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. यापूर्वीही प्रदर्शित झालेला छावा चित्रपटाच्या टीझरनेही सोशल मीडियावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विक्की कौशल स्टारर छावा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटील

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशलचा रुद्रावतार

धमाकेदार ट्रेलर पाहून लाखो चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Chhaava Movie Trailer Video : गेल्या अनेक महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेला विक्की कौशल स्टारर 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. यापूर्वीही प्रदर्शित झालेला छावा चित्रपटाच्या टीझरनेही सोशल मीडियावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अशातच तमाम प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या छावा चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. छावामध्ये विक्कीचा रुद्रावतार पाहून अनेकांना धडकीच भरेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
छावाच्या ट्रेलरने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे विक्की कौशले या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं सोशल मीडियावर खूप कौतकु केलं जात आहे. विक्कीच्या चाहत्यांसह मराठी कलाकारही या चित्रपटाच्या ट्रेलरचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करत आहेत. विक्कीची दमदार आवाजातील डायलॉगबाजी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमध्ये तुम्ही अभिनेत्री रश्मिका मंदानालाही जबरदस्त भूमिकेत पाहू शकता. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना या चित्रपटात झळकणार आहे.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! अपात्र महिलांना पैसे परत द्यावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
तर अक्षय खन्ना या चित्रपटात मुघल साम्राज्याचे बादशाह औरंगजेबची व्यक्तीरेखा साकारणार आहे. अक्षय खन्ना यांच्या भन्नाट लूक पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटात आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, डायना पेंटी यांचाही रोल असणार आहे. या चित्रपटाला मेडॉक फिल्म्सने प्रोड्युस केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन 'मिमी' फेम डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. दरम्यान, हा चित्रपट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होणार आहे.
हे ही वाचा >> Saif Ali Khan meets Auto Driver : अर्ध्या रात्री मदतीला धावून आलेल्या रिक्षा चालकाला सैफची झप्पी, फोटो समोर
विक्कीचा हा मराठा सम्राटचा लूक पाहून चाहत्यांना बाजीराव मस्तानीच्या रणवीर सिंगच्या रोलची आठवण झालीय. विक्की कौशलने छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंधाना त्यांच्या पत्नीच्या (येसूबाई भोसले) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून आज ट्रेलर रिलीज झाल्याने या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.