BBL Surgery : परफेक्ट फिगरसाठी मॉडेल्स करतात ती बट लिफ्ट सर्जरी म्हणजे काय? मृत्यूचा धोका असूनही दरवर्षी...
आजच्या युगात परफेक्ट फिगर मिळवण्याच्या हव्यासापोटी लोक प्रत्येक मर्यादा ओलांडायला तयार असतात. यामुळेच, बीबीएल (ब्राझिलियन बट लिफ्ट) शस्त्रक्रियेचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बट लिफ्ट सर्जरी कशी केली जाते?
BBL सर्जरी किती धोकादायक आहे?
बट लिफ्ट सर्जरीचा ट्रेंड कुठून आला?
BBL Surgery : सौंदर्य म्हणजे नेमकं काय यासाठी कोणतेही निश्चित निकष नाहीत, त्याची व्याख्या नाही. त्याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. काहींसाठी ते आकर्षक शरीरयष्टी आहे तर काहींसाठी चेहऱ्यावरचं हास्य... पण ग्लॅमरच्या दुनियेत 'परफेक्ट फिगर'चं एक खास आकर्षण तयार झालं आहे. पण तशी फिगर तयार करण्याचा हट्ट कधी कधी घातकही ठरू शकतो.
ADVERTISEMENT
आजच्या युगात परफेक्ट फिगर मिळवण्याच्या हव्यासापोटी लोक प्रत्येक मर्यादा ओलांडायला तयार असतात. यामुळेच, बीबीएल (ब्राझिलियन बट लिफ्ट) शस्त्रक्रियेचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. यामध्ये, शरीराच्या कोणत्याही भागातून चरबी काढून टाकली जाते आणि आणि ती काही विशिष्ट अवयवांमध्ये भरली जाते. त्या अवयवांवरील फुगवटा आणि आकर्षक दिसण्यासाठी हे केलं जातं. मात्र, ही शस्त्रक्रिया जितकी लोकप्रिय आहे, तितकीच धोकादायक आहे.
डेमी ॲगोग्लियाच्या मृत्यू
अलीकडेच, 26 वर्षीय ब्रिटीश महिला डेमी ऍगोग्लियाच्या मृत्यूने पुन्हा BBL शस्त्रक्रियेच्या धोक्यांची चर्चा सुरू झाली होती. स्वस्त शस्त्रक्रिया करण्यासाठी डेमी तुर्कीमध्ये गेली होती. पण तिचा हा निर्णय तिच्या आयुष्यातील शेवटचा निर्णय ठरला. चुकीची शस्त्रक्रिया आणि निष्काळजीपणामुळे डेमीला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >>Allu Arjun Released : तुरूंगाबाहेर येताच अल्लू अर्जुन म्हणाला ज्या कुटुंबातल्या महिलेचा मृत्यू झाला, त्यांना...
BBL शस्त्रक्रिया धोकादायक का आहे?
डॉ. लॉरेन्स कनिंगहॅम यांच्या मते, बीबीएल शस्त्रक्रियेमध्ये शरीराच्या कोणत्याही भागातून चरबी काढून ती ठराविक अवयवांमध्ये भरली जाते. पण ही चरबी चुकीच्या ठिकाणी किंवा खूप खोलवर टोचली तर फॅट एम्बोलिझमचा धोका असतो. फॅट एम्बोलिझम म्हणजे चरबी शिरांमधील रक्तप्रवाहात जाते आणि रक्तप्रवाहाला अडचणी येतात. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. हे जीवघेणं ठरू शकतं. ही शस्त्रक्रिया अनेकदा पुरेसा अनुभव किंवा पात्रता नसलेल्या डॉक्टरांकडून केली जाते, ज्यामुळे धोका आणखी वाढतो.
4000 लोकांमध्ये एकाचा मृत्यू
एका अहवालानुसार, बीबीएल शस्त्रक्रिया करणाऱ्या 4000 लोकांपैकी पैकी एकाचा मृत्यू होतो. यामुळे ही जगातील सर्वात धोकादायक कॉस्मेटिक सर्जरी असं म्हटलं जातं. असं असूनही, BBL ची मागणी दरवर्षी 20% नी वाढते आहे. ग्लॅमरस फिगर मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्यास लोक मागेपुढे पाहत नाहीत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> CM Revanth Reddy on Allu Arjun : "अल्लू अर्जून गाडीवर उभं राहून...", अल्लू अर्जूनच्या अटकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
बीबीएलचा ट्रेंड कुठून सुरू झाला?
BBL शस्त्रक्रियेची सुरुवात 1960 च्या दशकात ब्राझिलियन सर्जन इवो पितांगी यांनी केली होती. तर 2010 च्या दशकात ही शस्त्रक्रिया जगभर लोकप्रिय झाली. जेव्हा लोक किम कार्दशियन आणि निकी मिनाज सारख्या सेलिब्रिटींच्या फिगरला पाहून आकर्षित झाले, तेव्हापासून या शस्त्रक्रियेचा ट्रेंड चांगलाच वाढला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT