सुट्टीत थंड ठिकाणी जाण्याचा करताय प्लान? मग, फॉलो करा ‘या’ Skin Care टिप्स!
कडाक्याच्या थंडीतही तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार दिसावी असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी काही स्किन केअर टिप्स आहोत. ज्या आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Winter Skin Care Routine : नोव्हेंबर महिना संपत आला असून आता थंडी आणखी वाढणार आहे. बहुतेक लोक डिसेंबर महिन्यात फिरायला जाण्याचा प्लान करतात कारण या महिन्यात पर्वतांमध्ये खूप बर्फवृष्टी होते. या काळात बहुतांश लोकांना ज्या समस्येचा सामना करावा लागतो तो म्हणजे त्वचेचे नुकसान. विशेषत: कोरडी त्वचा असलेल्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. (Planning to go somewhere in Winter vacation Then follow these Skin Care tips)
ADVERTISEMENT
पण तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. कडाक्याच्या थंडीतही तुमची त्वचा मुलायम आणि चमकदार दिसावी असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी काही स्किन केअर टिप्स आहोत. ज्या आपण जाणून घेऊयात.
वाचा : Pune: ठोसा मारताच मोडलं नाक अन्… दुबईत बर्थडे करायचा होता पतीने नकार देताच महिलेचं जीवघेणं कृत्य!
कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हिवाळ्यात ‘या’ स्किन केअर टिप्स फॉलो करा
हायड्रेशन महत्वाचे आहे – थंड हवेमध्ये हायड्रेशन नसल्यासारखेच असते ज्यामुळे तुमची त्वचा आणखी कोरडी होऊ लागते. कोणतीही स्किनकेअर करण्यापूर्वी, तुमचे शरीर हायड्रेटेड असल्याची खात्री करा. यासाठी जास्तीत जास्त पाणी, हर्बल टी, सूप इत्यादींचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराइज राहील.
हे वाचलं का?
वाचा : Crime : बायको आणि दोन मुलींची हातोडीने ठेचून हत्या, मजूराने स्वत:चचं कुटुंब का संपवलं?
त्वचेला लेअरिंगची गरज असते – ज्याप्रमाणे तुम्ही हिवाळ्यात तुमच्या त्वचेला थंडीपासून वाचवण्यासाठी भरपूर कपडे घालता, त्याचप्रमाणे हिवाळ्यात तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्हाला लेअरिंग आणि संरक्षणाची गरज असते. यासाठी तुम्ही हायड्रेटिंग क्लीन्सर वापरणे महत्त्वाचे आहे, त्यानंतर त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर लावा आणि शेवटी सनस्क्रीन लोशन वापरा. या सर्व गोष्टी तुमच्या त्वचेचे थंड वारे आणि सूर्याच्या धोकादायक किरणांपासून संरक्षण करतील.
रात्री हाच रूटीन फॉलो करा – हिवाळ्याच्या काळात रात्री खूप जोरदार आणि थंड वारे वाहतात, जे तुमच्या त्वचेसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. अशा वेळी, रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेण्याचे नियम पाळणे विसरू नका. रात्रीच्या वेळी त्वचेवर ग्लिसरीन, व्हिटॅमिन ई आणि मॉइश्चरायझर जरूर वापरा.
ADVERTISEMENT
वाचा : Team India : राहुल द्रविड टीम इंडियाला करणार बाय बाय, ‘या’ दोन संघाकडून मोठी ऑफर
स्क्रब महत्वाचे आहे – जसे आपल्यासाठी श्वास घेणे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे त्वचेसाठी श्वास घेणे महत्वाचे आहे. आपल्या त्वचेवर डेड स्कीनचा थर तयार होतो ज्यामुळे आपली त्वचा श्वास घेऊ शकत नाही. मृत पेशींमुळे आपली त्वचा कोरडी दिसते आणि ती चमकत नाही. या मृत पेशींना वेळोवेळी काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याला आपण एक्सफोलिएशन म्हणतो. यासाठी आठवड्यातून दोनदा फेस स्क्रब वापरा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT