Ladki Bahin Yoajan: महिलांनो! लगेच मिळतील 4500 रुपये, पण Aadhaar कार्डचं 'हे' काम तातडीनं करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Aadhar Seeding Process
How To Check DBT Status
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींनो! आधार कार्ड संबंधीत 'ही' माहिती आताच वाचा

point

...तरच तुमच्या खात्यात जमा होतील 4500 रुपये

point

आधार सीडिंग म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Mazi Ladki Bahin Yojana Aadhar Seeding Process : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन माहिती समोर येत असून आतापर्यंत 2 कोटींहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या योजनेच्या अर्जाची मुदतवाढ दिल्यानं अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे. तसच सप्टेंबर महिन्यात ज्या महिलांचे अर्ज वैध ठरले आहेत, अशा महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्त्याची प्रतीक्षा लागली आहे. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या खात्यात लवकरच तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहेत. परंतु, ज्या महिलांच्या खात्यात आधार सीडिंग असेल, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांनी आधारसंबंधीत हे काम केलं नसेल, त्यांना पैसै मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आधार सीडिंगबाबत महिलांना पडलेत अनेक प्रश्न

आधार सीडिंगबाबत अनेक महिलांना प्रश्न पडला आहे. आधार सीडिंग कसं अपडेट करायचं? यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी? आधार सींडिंगची आवश्यकता का आहे? या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रक्कम पाठवल्यानंतरही काही महिला तक्रारी नोंदवतात. या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता जमा झालेला नाही, अशाप्रकारच्या तक्रारी महिलांकडून केल्या जातात. पण या महिलांना आधारकार्ड संबंधीत सर्व माहिती असणं गरजेचं असतं. महिलांनी सर्वप्रथम त्यांचे आधारकार्ड बँकेशी लिंक करावे. त्यानंतर डीबीटी एनेबल करावं. पण आधार सीडिंग आणि डीबीटी स्टेटस तपासण्याबाबत अनेकांना माहित नाही. आम्ही तुम्हाला याबाबत अचूक माहिती सांगणार आहोत.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : प्रेमी युुगुलांसाठी आनंदाची बातमी! पण 'या' राशीच्या लोकांवर येणार आर्थिक संकट?

'असं' करा आधार सीडिंग

सर्वात आधी तुम्हाला npci.org.in या वेबसाईटवर क्लि करावं लागेल. त्यानंतर होम पेजवर Consumer वर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला आधार सीडिंगचा विकल्प दिसेल. ते आधार सीडिंग एनेबल करा. त्यानंतर लगेच आधार क्रमांक भरा. या प्रोसेस झाल्यावर बँक खाते आणि खाते क्रमांक अचूकपणे निवडा. त्याबाजूला असलेल्या बॉक्सवर क्लिक करा आणि कॅप्चा भरा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमची रिक्वेस्ट स्वीकारली जाईल आणि आधार बँकेतू सीडिंग केले जाईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डीबीटी स्टेटसबाबत ही माहिती वाचाच

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांनी सर्वात आधी डीबीटी (DBT) स्टेटस तपासावं. डीबीटी स्टेटस तपासण्यासाठी होम पेजवर असलेल्या आधार सीडिंग पेजवर भेट द्यायची. या पेजवर Request To Aadhar Seeding बटणावर क्लिक करा. त्यानंतर Get Aadhaar Mapped Status वर क्लिक करा. आधार नंबर टाकून कॅप्चा भरा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर डीबीटी स्टेटस दिसेल. डीबीटी एनेबल आहे की नाही याची खात्री करा. डीबीटी एनेबल असल्यास पैसे जमा होतील. पैसे खात्यात जमा झाले नाही, तर बँकेत जाऊन डीबीटी सुरु करा.

हे ही वाचा >> PM नरेंद्र मोदी आजपासून UNITED STATES दौऱ्यावर, किती दिवसांचा असणार दौरा? पाहा VIDEO

    follow whatsapp

    ADVERTISEMENT