Ladki Bahin Yojana : 'हा' फॉर्म भरा! झटपट बँकेत योजनेचे पैसै होतील जमा

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana fill up npci form and submit to yount bank mukhyamantri ladki bahin yojana scheme ajit pawar eknath shinde aditi tatkare
तुम्हाला एनपीसीआय फॉर्म (NPCI Form)भरावा लागणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तुम्हाला एनपीसीआय फॉर्म भरावा लागणार आहे.

point

हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर आधार लिंक होणार

point

आधार लिंक झाल्यावर खात्यात योजनेचे पैसे येणार

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरूस्त करता येतो.पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तर नक्कीच टेन्शन वाढते. त्यामुळे हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायाचा तुम्ही अवलंब केलात तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे हा नेमका पर्याय काय आहे? आणि तुमच्या बँकेत पैसे कसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana fill up npci form and submit to yount bank mukhyamantri ladki bahin yojana scheme ajit pawar eknath shinde aditi tatkare)  

लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तो नसेल तर तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार नाही आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला एनपीसीआय फॉर्म (NPCI Form)भरावा लागणार आहे. हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक होते आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होणार आहे.

हे ही वाचा : Shivaji Maharaj: परवानगी फक्त 6 फुटाच्या पुतळ्याला, अचानक कोणी वाढवली महाराजांच्या पुतळ्याची उंची?

खरं तर बऱ्याच वेळेस शासनामार्फत जे पैसे येतात ते DBT पद्धतीने म्हणजेच (Direct Benefit Transfer) पद्धतीने पाठविले जातात. जेव्हा हे पैसे पाठविले जातात तेंव्हा ते ज्या बँक खात्याला NPCI सीडिंग आहे त्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. पण बऱ्याच वेळेस असा समज होतो कि आपले जे आधार कार्ड आहे हे सगळ्याच बँक खात्यांना लिंक आहे परंतु तसे नसते. कोणत्याही एका बँक खात्याला हे NPCI आधार लिंक होत असते आणि त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे जमा होत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जर तुम्हाला हा फॉर्म बँक शाखेत जमा करून द्यायचा आहेत. तर हि सर्व प्रोसेस अगदी सविस्तरपणे समजून घेऊयात, जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अडकलेले पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

NPCI आधार सीडिंग संदर्भातील प्रोसेस कशी असते? 

NPCI हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

फॉर्मवर तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा चिटकवीने आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT

बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, तुमचा खाते क्रमांक, खातेदार यांची सही आणि खातेदाराचे नाव फॉर्मवर लिहायचे आहे. 

आधार कार्ड आणि बँक पासबुकचे झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचे आहेत. 

हे ही वाचा : Waman Mhatre: वामन म्हात्रेंना अटक होणार? कोर्टाचा दणका; नेमकं प्रकरण काय?

हा फॉर्म तुम्हाला बँक शाखेत जमा करून द्यायचा आहेत. 

ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT