Ladki Bahin Yojana : नवीन फॉर्म भरून झटपट मिळवा 4500 रूपये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana how to fill up new form of mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात खूप चर्चा आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म झटपट भरा

point

फॉर्म तुम्ही अचूकपणे भरलात तर पैसे मिळणार आहेत

point

सरकारने नवीन जीआर काढला

Mukhymantri ladki bahin yojana scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात खूप चर्चा आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. असे असताना आता लाडकी बहीण योजनेत सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhymantri ladki bahin yojana) नवीन फॉर्म समोर आला आहे. हा फॉर्म तुम्ही अचूकपणे आणि व्यवस्थित भरल्यास तुमच्या खात्यात झटपट पैसे जमा होणार आहे. (ladki bahin yojana how to fill up new form of mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar devendra fadnavis) 

लाडकी बहीण योजनेत सरकारने नवीन जीआर काढला आहे. या जीआरनुसार आता सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्या महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार आहेत. त्याचसोबत ज्या महिलांनी अजूनही अर्ज केले आहेत, त्यांनाही अर्ज करता येणार आहे. 

नवीन फॉर्म कसा भरायचा? 

नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. तसेच जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर ती निवडा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री' शब्द वगळला! लाडक्या बहिणींवरून महायुतीतल्या भावांचे एकमेकांना चिमटे, मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?

ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हॅलिडेटे वर क्लिक करा. मग तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यात महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत लिहा. कॉलममध्ये वडिलांचे नाव लिहा. विवाहित असल्यास पतीचे नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत लिहा. वैवाहिक स्थितीचाही पर्याय निवडा. 

ADVERTISEMENT

आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होय या पर्यायावर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या इतर राज्यात जन्म झाला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे लिहा. पिनकोड लिहा. आणि जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका निवडा. जो मतदारसंघ असेल, तो बिनचूक निवडा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाका.

ADVERTISEMENT

आधार लिंक असलेला बँक खातं द्या 

तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाच्या स्थितीबाबत मेसेज येतील. तुम्ही जर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाते नंबर व्यवस्थित चेक करून भरा. बँकेची इतर आवश्यक माहिती भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असल्यास होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या.

हे ही वाचा :  lalbaugcha Raja : अनंत अंबानींवर 'लालबागचा राजा' मंडळाची मोठी जबाबदारी, 'या' पदावर नियुक्ती का केली?

ही कागदपत्रे अपलोड करा 

दरम्यान यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागची बाजू अपलोड करा. तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास बरोबर पर्याय निवडा. रेशनकार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करा. नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. ते नसल्यास ऑनलाईन डाऊनलोड करा. हमीपत्रा मधील प्रत्येक पर्यायावर वाचून तो पर्याय तुम्हाला लागू होत असल्यास टीक मार्क करा आणि सही करा.

त्यानंतर अगदी शेवटी बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे.आणि डिक्लेरेशनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. हमीपत्र स्विकारा यावर क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या. दरम्यान तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT