Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

मुंबई तक

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?

ADVERTISEMENT

सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे.
ladki bahin yojana scheme women will get benefit of third installement but how much money deposite in your account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार

point

तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

point

1500 की 4500 रूपये खात्यात येणार?

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500  जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme women will get benefit of third installement but how much money deposite in your account mukhymantri ladki bahin yojana scheme eknath shinde aditi tatkare ajit pawar)   

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Aarya Jadhao : ''...तर बिग बॉसमध्ये पुन्हा परतणार'', Insta लाईव्हवर आर्याने निक्कीला भिडण्याचे दिले संकेत

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत. 

मग 3500 कुणाला मिळणार? 

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. 

हे ही वाचा : Gold Rate : बाईईई! काय तो सोन्याचा भाव! स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत झाले मोठे बदल

'या' महिलांना सप्टेंबरपासून लाभ 

राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते. 

अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते.  एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.  संबंधित व्यक्तीनं  पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp