Ladki Bahin Yojana : 'या' लाडक्या बहिणींचं 7500 रूपयांच झालं नुकसान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana these women did not get 7500 installment amount because the file application in mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar
या लाडक्या बहिणींनी हातातले 7500 गमावले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' महिलांच्या खात्यात एकही रूपया आला नाही

point

7500 रूपयांचं महिलांचं झालं नुकसान

point

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोंबर 2024 ला होती. या मुदतीतही अनेक महिलांना योजनेत अर्ज करता आला नाही. आणि आता राज्यात निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागली आहे. अशा अवस्थेत योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याचीही शक्यताही कमी आहे. त्यामुळे ज्या महिला अजूनही अर्ज करू शकल्या नाहीयेत त्या महिलांचे 7500 रूपयांचे नुकसान झालं आहे. (ladki bahin yojana these women did not get 7500 installment amount because the file application in mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar)

सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या घोषणेनंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै ठरवण्यात आली होती. मात्र 31 जुलैपर्यंत अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. तसेच सरकारी कार्यालयातील रांगा आणि दाखल्यासाठीची धडपड पाहता सरकारने योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाता होता.

आता 31 ऑगस्टनंतर देखील अनेक महिला या योजनेत अर्ज करण्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे सरकारने पुन्हा महिन्याभराची म्हणजेच 30 सप्टेंबरची मुदत वाढवली होती. या मुदतीतही असंख्य महिलांनी अर्ज भरले होते. त्यानंतरही अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाच नव्हता. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत शेवटची असेल याचे संकेत आधीच मिळत होते. कारण राज्यात विधानसभा निवडणूक लागणार होती. त्यामुळे सरकार मुदतवाढ देण्याची शक्यता कमी होती. आणि आता तसेच घडताना दिसतेय. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे ज्या महिला 15 ऑक्टोंबरपर्यंतही जर अर्ज करू शकल्या नाही आहेत. त्यांना मोठा धक्का बसला आहे.कारण त्यांच्या खात्यात एकही रूपया आला नाही. सरकारने आतापर्यंत पाच महिन्यांचा निधी म्हणजेच 7500 महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे ज्या महिला योजनेत अर्ज करू शकल्या नाहीयेत त्यांना मोठा धक्का बसला आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT