Digital Scam: बँक खात्यात पैसे नाही तरी तुमच्या लाखो रुपयांवर डल्ला, काय आहे हे नवं Scam?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नवा Scam आलाय समोर, सावध राहा (प्रातिनिधिक फोटो)
नवा Scam आलाय समोर, सावध राहा (प्रातिनिधिक फोटो)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम?

point

खोटी अटक करून फसवलं जातं?

point

गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असल्याचा दावाही केला जातो.

Online Scam: मुंबई: फोन करून, खोटी माहिती देऊन, आपल्याकडून ओटीपी घेऊन पैसे उकळण्याचा पॅटर्न आता जुना झालाय. मात्र आता फोन करून तु्म्हाला गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचं सांगून तुम्हाला खोटी अटक करून लाखो उकळणारी एक टोळी आता समोर आली आहे. या टोळीनं आतापर्यंत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातलाय. तर दुसरीकडे तुमच्या नावाने लोन घेऊन ते लुबाडण्याचं कामंही काही टोळ्या करतायत. नेमका हा प्रकार काय आहे ते जाणून घेऊ. (Digital arrest scam and fake loan scam cybers fraud how to be aware) 

तुमच्या बँक खात्यावर फार थोडे पैसे आहेत, मग तुम्हाला या टोळ्या कशा लुटतील या आत्मविश्वासात असलेल्या प्रत्येकासाठी हा धोक्याचा इशारा आहे. कारण आता तुमच्या खात्यातले पैसे सोडाच, पण थेट तुमच्या नावावर बँक लोन घेऊन ते पैसे लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. हे लोन तुमच्या नावावर घेतलं गेल्यानं तुम्हाला मोठं नुकसान यामुळे होऊ शकतं.

हे ही वाचा>> Govt Job: NHM अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! अशी आहे अर्ज प्रक्रिया... 

काय आहे डिजिटल अरेस्ट स्कॅम?

तुम्हाला एखाद्या नंबरवरुन कॉल येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावाने विदेशात जाणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलं किंवा तुमच्या खात्याचा वापर मनीलाँड्रींगसाठी झालाय. अशी बतावणी करून तुमचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं म्हणत तुमच्यावर अनेक खोटे आरोप करत, तुम्हाला घाबरवलं जातं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अचानक आलेल्या या फोनमुळे घाबरलेले अनेकजण जाळ्यात अडकतात. कारण खरं नाट्य यापूढे सुरू होतं. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करून तुम्हाला कॅमेऱ्यासमोर राहायला सांगितलं जातं. तसंच यादरम्यान तोतया CBI किंवा अन्य काही तपास अधिकारी तुम्हाला व्हाट्सअप कॉल आणि त्यानंतर स्क्रिन शेअरींग करायला सांगतात. त्यानंतर तुमच्या फोनवर बँकेकडून ओटीपी येतो आणि स्क्रिन शेअरींग सुरू असल्यानं तो ओटीपी त्यांना सहज पाहता येतो.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : 'दिवाळी बोनस'साठी 'या' महिलाच पात्र, खटाखट 5500 येणार खात्यात?

इथेच आपण फसतो आणि हवं तेवढं बँक लोन आपल्या नावाने घेतलं जातं. कारण आज अनेक बँका आपल्या नावाने प्री अप्रूव्हड लोन देतात. यासाठी फक्त एका ओटीपीची गरज असते. त्यामुळे अनेक टोळ्या याचा फायदा घेऊन लोकांना लुटताना दिसतायत. 

ADVERTISEMENT

या घटनांपासून कसं सुरक्षित राहाल? 

१. अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल उचलणं टाळा.

ADVERTISEMENT

२. अनोळखी कॉलवर बोलताना सावधान राहा. 

३. ओटीपी कुणाशीही शेअर करू नका. 

४. बँक खात्याशी संबंधीत माहितीदेखील कुणाला देऊ नका.

५. बँक खात्यासाठी आणि ऑनलाईन बँकिंगसाठी लागणारे स्ट्राँग पिन आणि पासवर्ड वापरा. 

६. बँक खात्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या लहानात लहान रकमेवर आणि व्यवहारावर लक्ष ठेवा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT