Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का, कुठे पाहता येणार यादी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana where can you see the eligibility list of mukhymantri ladki bahin yojana scheme read full details
लाडकी बहीण योजनेत आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची प्रतिक्षा

point

महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे?

point

आठवड्याच्या या दिवशी पात्रता यादी पाहता येणार

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना (Applicant Women) आता पात्रता यादीची (Eligibility List) प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana where can you see the eligibility list of mukhymantri ladki bahin yojana scheme read full details) 

ADVERTISEMENT

लाडकी बहिण योजनेची घोषणा झाल्यापासून दररोज हजारोंच्या संख्येने महिला अर्ज भरत आहेत. दररोज साधारण 70 ते 80 हजार महिला अर्ज करत आहेत. आता या अर्जदार महिलांची संख्या 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 च्या घरात पोहोचली आहे. या महिलांसमोर आता त्यांचा अर्ज पात्र की अपात्र ठरला आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या महिलांना पात्रता यादीची प्रतिक्षा लागली आहे. 

हे ही वाचा : Samit Kadam : फडणवीस-देशमुख वादातील समित कदम कोण?

कुठे पाहाल यादी? 

लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

योजनेत 6 मोठे बदल 

गेल्याच आठवड्यात राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल केले होते. यामध्ये सरकारने पात्रता यादीबाबत निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे महिलांना दिलासा मिळाला होता. दरम्यान हे 6 मोठे बदल कोणते होते हे जाणून घेऊयात.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे. 

ADVERTISEMENT

एखाद्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरूषासोबत विवाह केला तर त्या महिलेच्या पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.

ADVERTISEMENT

ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.

नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.

हे ही वाचा : NCP : अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सुनावणीत काय घडलं?

खात्यात पैसै कधी जमा होणार? 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT