Badlapur Rape Case : बदलापूर पुन्हा हादरलं! कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

मिथिलेश गुप्ता

Badlapur Rape Case : बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कॅन्सरग्रस्त 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

ADVERTISEMENT

एआय जनरेटेड (लाक्षणिक चित्र).
Badlapur Rape Case (फोटो सौजन्य - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बलात्काराच्या घटनेमुळं बदलापूरमध्ये खळबळ!

point

कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

point

केमो ट्रिटमेंट दरम्यान पीडित मुलगी गर्भवती असल्याचं उघड

Badlapur Rape Case : बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. कॅन्सरग्रस्त 13 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरांनी केमोचे उपचार सुरु केले होते. परंतु, पीडित मुलगी गर्भवती असल्याचं डॉक्टरांना केमेच्या ट्रिंटमेंट दरम्यान समजलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, कॅन्सरग्रस्त पीडित मुलगी बिहारची असून ती उपचारासाठी बदलापूर येथे आली होती. त्यानंतर त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने या मुलीची राहण्याची व्यवस्था केली. तसच तो व्यक्ती पीडित मुलीला उपचारासाठी मदत करत होता. त्याचदरम्यान या नराधमाने पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केला आणि ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.

पीडित मुलगी कॅन्सरग्रस्त असल्याने तिला केमो ट्रिटमेंटची आवश्यकता होती. त्यामुळे उपचारासाठी ही मुलगी रुग्णालयात गेली असता, डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा >> Crime : रिल स्टार सुरेंद्र पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा! पोलिसांनी नाशिकमधून केली अटक, नेमकं काय घडलं?

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॅन्सर पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारानंतर ती गर्भवती राहिली. मात्र ती कॅन्सर पीडित असल्याने तिला केमो घ्यावे लागत होते. हेच केमो घेण्यासाठी ती गेली असता तपासणी दरम्यान तिच्या पोटात गर्भ वाढत असल्याचं डॉक्टरांना समजलं. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पडणार पावसाच्या हलक्या सरी! 'या' ठिकाणी घोंगावणार सोसाट्याचा वारा

अल्पवयीन पीडित मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीने हे अत्याचार केले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. ही मुलगी बिहार राज्यातून महाराष्ट्रात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला बदलापुरात राहण्याची सोय केली होती आणि तिच्या उपचारासाठी तो मदत करत होता. यादरम्यान त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि ती गर्भवती राहिली, मात्र केमोचे उपचार घेत असताना ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलीय. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp