पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी कैद्यांना मिळते सुट? तुरुंगात विशेष रुमचीही सुविधा!
Knowledge Story : जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांना काही अधिकार देखील असतात. या अधिकारात त्यांना विशेष सुविधा पुरवल्या जातात, त्यांची विशेष काळजी घेतली जाते. नेमकी कैद्यांसाठी जेलमध्ये काय व्यवस्था करण्यात येते? यासबंधित नियम काय आहेत?
ADVERTISEMENT
Knoywledge Story : जेल (तुरुंग) म्हटलं की कठोर नियम आलेच, कुठल्याही प्रकारची सुविधा न देता कैद्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप व्हावा,यासाठी कठोर शिक्षा दिली जाते. मात्र असे जरी असले तरी जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांना काही अधिकार देखील असतात. या अधिकारात त्यांना विशेष सुविधा पुरवल्या जातात, त्यांची विशेष काळजी घेतली जाते. नेमकी कैद्यांसाठी जेलमध्ये काय व्यवस्था करण्यात येते? यासबंधित नियम काय आहेत? हे जाणून घेऊयात. (prisoners get parole spend time with wife and how they get room in jail knowledge story)
ADVERTISEMENT
जेलमध्ये कैदेत राहणाऱ्या व्यक्तींच्या अधिकाराचा देखील विचार केला जातो. यातूनच कैद्यांना त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी विशेष सुट देण्यात येते. यासोबत दोघांना एकांतात वेळ घालवता यावा यासाठी विशेष खोली देखील पुरवली जाते.
हे ही वाचा : उत्पन्नाचा दाखला नसेल तरी टेन्शन घेऊ नका, असे मिळतील 1500 रुपये!
नियम काय?
'खरं तर, भारतात असा कुठलाही कायदा नाही, ज्यामध्ये कैद्यांना त्याच्या पार्टनरची भेट घेण्याची परवानगी देतो. पण ही एक भेट असते, जिथे एका कैदीला त्याच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्याची परवानगी देतो. या दरम्यान कैदी त्याच्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध देखील प्रस्थापित करू शकतो. यासाठी परवानगीचीही गरज असते. खरं तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने यासाठी परवानगी दिली असून जोडीदारासोबत वेळ घालवण्यास सूट दिली आहे, असे दिल्ली हायकोर्टाचे वकील प्रेम जोशी यांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
या गोष्टीचा संबंध एका अधिकाराशी संबंधित आहे. त्यामुळे याला विशेषाधिकार म्हणून वापरले जाऊ शकत नाही. मात्र, कॅनडा, जर्मनी, रशिया, स्पेन, बेल्जियम, स्पेन, सौदी अरेबिया, डेन्मार्क, अमेरिका अशा काही देशांमध्ये अशा भेटींसाठी कायदा असून त्यांना सूट देण्यात आली आहे.
2015 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यास आणि गर्भधारणेबाबत परवानगी दिली होती. यावेळी न्यायालयाने तुरुंगात कैद्यांना गर्भधारणेचा अधिकार असून तो मूलभूत अधिकार असल्याचे म्हटले होते,असे प्रेम जोशी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Vidhan Sabha Election 2024 : महायुतीची डोकेदुखी वाढणार?
तुरुंगात अशी असते खोल्यांची व्यवस्था
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, पंजाबमधील काही तुरुंगात नातेवाईकांसोबत खाजगी वेळ घालवण्यासाठी खोल्यांची सुविधा आहे. जिथे कैदी परवानगी घेऊन त्यांच्या पार्टनरला भेटू शकतात. रिपोर्टनुसार, पंजाबमधील काही तुरुंगात खोल्या बनवण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये डबल बेड आणि वॉशरूम असतात. त्यासोबत एक टेबल आणि दोन खुर्च्या देखील असतात. खोलीत पाण्याचीही व्यवस्था असते. जेव्हा एखाद्या पती-पत्नीची भेट होते, तेव्हा खोली बाहेरून बंद केली जाते. या दरम्यान कैद्याला दोन तास खोलीत वेळ घालवण्याची परवानगी दिली जाते. खरं तर अशी सुविधा प्रत्येक जेलेमध्ये नसते. या संबंधित कोर्टाच्या निर्णयावर निर्भर असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT