Wash Basin आणि बाथरुमच्या पाईपजवळ केस अडकलेत? एका मिनिटात ब्लॉकेज साफ होईल, फक्त 'हे' लगेच करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

How To Clean Stuck Hairs News Bathroom Pipeline
How To Clean Stuck Hairs News Bathroom Pipeline
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाथरुमच्या पाईपजवळ अडकलेले केस साफ करण्याचे सोपे उपाय जाणून घ्या

point

वॉश बेसिनमध्ये अडकलेले केस कसे कराल साफ?

point

जाणून घ्या सोप्या आणि साध्या टीप्स

Easy Tips To Clean Stuck Hairs Near Shower : आंघोळ करताना वॉश बेसिन किंवा बाथरुमच्या पाईपजवळ केस अडकणे, ही एक सामान्य समस्या आहे. केसांमुळे अनेकदा बाथरुमच्या पाईपजवळ ब्लॉकेज निर्माण होतो. त्यामुळे बाथरुममधील पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण होतो. पण पाईपजवळ अडकलेल्या केसांची गुत्था साफ करणं अनेकांच्या जमत नसेल. तसच केसांच्या साफसफाईत वेळही लागतो. (A common problem is blockage of pipes near the wash basin or bathroom while running a bath)

जर तुम्हीही या प्रकारच्या समस्येचा सामना करत असाल, तर आम्ही सांगितलेल्या टीप्सच्या मदतीने तुम्ही बाथरूमची साफसफाई करू शकता. आम्ही तुम्हाला खूप सोप्या टीप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे बाथरुमची साफसफाई करु शकता. जाणून घेऊयात या बाथरुम साफ करण्याच्या टीप्सबद्दल सविस्तर माहिती.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगार

यासाठी सर्वात आधी बाथरुमच्या पाईपमध्ये गरम पाणी टाका. त्यानंतर बेकिंग सोडामध्ये थोड्या प्रमाणात व्हिनेगार मिक्स करून ते पाणी पाईपमध्ये टाका. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा या पाईपमध्ये गरम पाणी टाका. असं केल्याने पाईपमध्ये अडकलेले केस साफ होऊ शकतात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

प्लंजर 

पाईप साफ करण्यासाठी तुम्ही प्लंजरची मदत घेऊ शकता. प्लंजर एक असं उपकरण आहे, जे पाईप साफ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यासाठी पाईपजवळ असलेल्या जाळीला हटवावं लागेल. त्यानंतर प्लंजरला पाईपमध्ये टाकून अडकलेले केस बाहेर काढू शकता.

मीठ आणि बेकिंग सोडा

अर्धा कप बेकिंग सोडामध्ये अर्धा चमच मीठ मिक्स करून ते पाईपमध्ये टाका. त्यानंतर 30 मिनिटांनी पाईपणध्ये गरम पाणी टाका. पाण्याचा प्रेशर जास्त पाहिजे, याची काळजी घ्या. असं केल्यानंही पाईपमध्ये अडकलेले केस बाहेर जाऊ शकतात. या टीप्सनेही बाथरूममध्ये अडकलेले केस बाहेर निघाले नाहीत, तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: '...तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होईल', शिवसेनेच्या 'या' आमदाराचं मोठं विधान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT