Sovereign Gold Bond : गोल्ड बाँड काय, परतावा किती, कशी करायची खरेदी? जाणून घ्या सर्वकाही

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SGB Tranche Open for Subscription : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना आणली आहे. आरबीआयने सार्वभौम गोल्ड बाँड (एसजीबी) ची नवीन योजना लॉन्च केली. ज्या अंतर्गत ग्राहक 11 सप्टेंबरपासून सलग पाच दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत गोल्ड बाँड खरेदी करता येईल. विशेष म्हणजे हे सोने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार असून ऑनलाइन पेमेंट करण्यावरही सूट दिली जात आहे. यासाठी गोल्ड बाँड कसे खरेदी करायचे याविषयी जाणून घेऊयात. (What is Sovereign Gold Bond how much return how to buy Know everything)

ADVERTISEMENT

सार्वभौम गोल्ड बाँड (SGB) ची नवीन योजना भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने लॉन्च केली. SGB सीरिज II साठी सब्सक्रिप्शन कालावधी 11 ते 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. बाँडची किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. 6 ते 7 सप्टेंबरच्या बुलियन मार्केटच्या आधारे ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी, जे गुंतवणूकदार गोल्ड बाँड खरेदीसाठी ऑनलाइन अर्ज करतात किंवा डिजिटल मोडद्वारे पेमेंट करतात त्यांना निश्चित किंमतीवरून 50/- रुपये प्रति ग्रॅम सूट मिळेल, त्यानंतर गोल्ड बाँडची किंमत 5,873/- प्रति ग्रॅम असेल.

Maratha Reservation : ओबीसींच आरक्षण कमी होणार? देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…

सार्वभौम गोल्ड बाँडचा कालावधी आणि व्याजदर

सार्वभौम गोल्ड बाँड (SGB) योजनेचा मॅच्युरिटी कालावधी एकूण 8 वर्षांचा आहे. तर, गुंतवणूकदार 5 वर्षांत त्यातून बाहेर पडू शकतात. सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना सहामाही नाममात्र मूल्यावर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज दिले जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

SGB ​​योजनेअंतर्गत सोने खरेदीवरील मर्यादा काय?

सार्वभौम सुवर्ण बाँड योजनेंतर्गत सोने खरेदी करण्यासाठी किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करावे लागेल, तर जास्तीत जास्त 4 किलोग्रॅम खरेदी करण्याची मर्यादा आहे. HUF साठी खरेदी मर्यादा 4 किलोग्रॅमवर निश्चित केली आहे. तर, ट्रस्ट आणि इतर समान संस्थांसाठी 20 किलोग्रॅमची खरेदी मर्यादा आहे.

Parikrama Yatra : ‘सर्टिफिकेशन द्यायची माझी कंपनी नाही’, पंकजाताई सरकारवर खोचकपणे बोलल्या…

सार्वभौम गोल्ड बाँडसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं?

  • क्रेडेन्शियल वापरून SBI नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.
  • मुख्य मेनूमधून ई-सेवांवर क्लिक करा.
  • Sovereign Gold Bond Scheme वर क्लिक करा
  • तुम्ही पहिल्यांदा गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. हेडर टॅबमधून रजिस्टर पर्याय निवडा, त्यानंतर ‘अटी आणि नियम’ निवडा आणि प्रोसीडवर क्लिक करा.
  • नावनोंदणीसाठी तुमचे सर्व डिटेल्स भरा.
  • NSDL किंवा CDSL मधील डिपॉझिटरी पार्टीसिपेंट निवडा जिथे तुमचे डीमॅट अकाउंट आहे.
  • यानंतर डीपी आयडी, क्लायंट आयडी टाका आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.
  • डिटेल्स वेरिफाई करा आणि सबमिट टॅबवर क्लिक करा.

Sovereign Gold Bond चे फायदे!

  • सार्वभौम गोल्ड बाँडचा महत्वाचा फायदा म्हणजे फिझिकल गोल्ड प्रमाणे यात तुम्हाला डिझाइन व मेकिंग चार्जेस द्यावे लागत नाही.
  • सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये स्टोरेज ची रिस्क नसते. तुम्ही केलेली गुंतवणूक सुरक्षित असते.
  • यात मिळणारे गोल्ड हे 24 कॅरेट चे असते. म्हणजेच इथे तुम्हाला एकदम प्युअर सोने दिले जाते.
  • भारत सरकारची सुरक्षा असल्याने या योजनेत सेफ्टी रिस्क नसते.
  • सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे तुम्हाला जीएसटी भरावं लागत नाही.

Ajit Pawar: ‘…तर, मी राजकारण सोडतो’, शरद पवारांना अजित पवारांचं चॅलेंज

SBI द्वारे सार्वभौम गोल्ड बाँड्स कसे खरेदी करावे?

  • क्रेडेन्शियल्स वापरून SBI नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा.
  • मुख्य मेनूमधून ई-सेवांवर क्लिक करा.
  • आता Sovereign Gold Bond Scheme वर क्लिक करा.
  • हेडर टॅबमधून बाँड पर्याय निवडा.
  • नियम आणि अटी टॅब निवडा आणि पुढे जा वर क्लिक करा.
  • आता सब्सक्रिप्शन वॉल्यूम आणि नामांकित डिटेल्स भरा. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाईलवर मिळालेला ओटीपी एन्टर करा आणि Verify वर क्लिक करा.
  • यानंतर, एका नवीन पेजवर तुम्हाला तुमच्या सार्वभौम गोल्ड बाँड गुंतवणूकीची सर्व माहिती मिळेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT