MVA: कोल्हापूरची जागा ठाकरे गटाने सोडली, पण मागितला 'हा' मतदारसंघ; अन्...
Shiv Sena UBT Sangli Lok Sabha: ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा सोडण्यास सहमती दर्शवली आहे. पण त्या मोबदल्यात त्यांनी सांगलीच्या जागेची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
Shiv Sena UBT Sangli: मुंबई: लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने एक अशी खेळी खेळलीय की, त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरचं राजकारण बदलून गेलं आहे. भाजप आणि त्यांच्या महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने थेट छत्रपती शाहू महाराज यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं समोर येत आहे. यासाठी शिवसेनेने (UBT) ही जागा सोडण्याची तयारीही दर्शवली असल्यांच खात्रीलायक सूत्रांकडून समजतं आहे. (mva lok sabha election 2024 shiv sena thackeray faction leaves kolhapur lok sabha seat to chhatrapati shahu maharaj but demands sangli constituency in return)
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) ने 'या' जागेच्या मोबदल्यात कोल्हापूरची जागा सोडली?
महाविकास आघाडीतील कोल्हापूरचा तिढा हा जवळजवळ सुटला असल्याचं समजतं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना (UBT) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा छत्रपती शाहू महाराजांना सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, या मोबदल्यात काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा मागितील आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बरीच चर्चा झाली. पण सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर महाविकास आघाडीचं एकमत झाल्याचंही आता बोललं जात आहे..
सांगली लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 साली भाजपचे संजय काका पाटील हे निवडून आले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना पराभूत केलं होतं.
हे वाचलं का?
प्रतीक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून 2019 ची लोकसभा लढवली होती. कारण 2019 लोकसभा आघाडीत काँग्रेसने सांगलीची जागा ही स्वाभिमानीसाठी सोडली होती. त्यामुळेच विशाल पाटील यांनी स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
दरम्यान, भाजपच्या संजय काका पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार नसल्याने आता ही जागा शिवसेनेला सोडण्यास तयार झाली असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी घेतलेली शाहू महाराजांची भेट
लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात आव्हान उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वत: शरद पवार हे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोल्हापूरला जाऊन छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली होती. याच भेटीनंतर त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चेने जोर धरला होता.
ADVERTISEMENT
जर शाहू महाराजांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली तर ते कोणत्या पक्षाकडून लढणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षातून तुतारी चिन्हावर लढण्याची दाट शक्यता आहे.
शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली तर कोल्हापुरात प्रचंड अटीतटीची लढत ही पाहायला मिळू शकते. या निवडणुकीत संजय मंडलिक यांना शाहू महाराजांचं मोठं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT