Chhagan Bhujbal: महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप..., भुजबळ ठाकरेंच्या दोन मोठ्या नेत्यांच्या संपर्कात?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

भुजबळ ठाकरेंच्या दोन मोठ्या नेत्यांच्या संपर्कात?
भुजबळ ठाकरेंच्या दोन मोठ्या नेत्यांच्या संपर्कात?
social share
google news

Chhagan Bhujbal and Shiv Sena (UBT): मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे बदलून गेलं आहे. राज्यातील जनतेने महायुतीला नाकारत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे आता परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. (earthquake in maharashtra politics soon a senior leader from shiv sena ubt met ncp leader and minister chhagan bhujbal last week sources)

छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत परतणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी छगन भुजबळांची भेट घेतल्याची माहिती आहे. समर्थकांकडून दबाव वाढल्यानंतर छगन भुजबळ हे विविध पर्याय शोधत असल्याचं बोललं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि छगन भुजबळ यांच्यात पक्षात स्वीकार करण्याबाबत आणि ज्येष्ठतेनुसार त्यांना सामावून घेण्याबाबत प्राथमिक बोलणी सुरू आहेत.

मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच राऊत आणि नार्वेकर यांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुमारे दोन दशकानंतर छगन भुजबळ हे स्वगृही परतणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. कारण मागच्या आठवड्यात संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे.

'या' दोन गोष्टी भुजबळांच्या जिव्हारी लागल्या?

लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ हे इच्छुक होते. त्यासाठी त्यांच्या नावाची बरीच चर्चा देखील होती. मात्र, शेवटच्या क्षणी शिवसेना (शिंदे गट) यांना ही जागा मिळाल्याने भुजबळांची निवडणूक लढविण्याची संधी हुकली. ज्यामुळे त्यांना नाराज असल्याचं समोर आलं होतं. 

ADVERTISEMENT

यानंतर भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी बरीच चर्चा होती. पण इथेही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने भुजबळ यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. या सगळ्या कारणामुळे छगन भुजबळ यांची पक्षातील नाराजी ही वाढत चालली आहे. 

यामुळे ते आता नेमका कोणत्या पक्षाचा पर्याय स्वीकारतात याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT