Eknath Shinde : "मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय...", ठाण्यात पोहोचताच शिंदेंचं मोठं विधान!
Eknath Shinde Press Conference : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी दरेगावात गेले होते. त्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

"माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका..."

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde Press Conference : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी दरेगावात गेले होते. त्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं. दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार आहे. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिंदेंनी आज ठाण्यात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं भाष्य केलं. "मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या.दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. सर्व सहकारी सोबत होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. यामध्ये कुणाचाही संभ्रम नको, म्हणून मागच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचा जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल", असं मोठं विधान शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं.
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, "मला विश्वास होता की, या निवडणुकीत प्रचंड यश मिळेल. आम्ही ज्या योजना केल्या त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत पाहायला मिळालं. आतापर्यंतच्या इतिहासात एव्हढ्या मेजॉरिटीने महायुतीला जे यश मिळालं, ते कधीच मिळालं नाही. तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली जात आहे, नेमकं काय ठरलंय? या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री, कॉमन मॅन म्हणून काम केलं. मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर कॉमन मॅन. कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या अडचणी समजून घेऊन सोडवण्याचं काम केलं. त्यामुळे लोकांची भावना असणं साहजिकच आहे".
हे ही वाचा >> Maharashtra CM पदाच्या रेसमध्ये 'या' नेत्याचं नाव सर्वात पुढे! माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, "भाजपचे पक्षश्रेष्ठी..."
"मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते. सर्व सहकारी सोबत होते. मिळालेलं यश प्रचंड आहे. यामध्ये कुणाचाही संभ्रम नको, म्हणून मागच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्रिपदाबाबतचा जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असेल, असं मी सांगितलं आहे. त्यामुळे किंतू, परंतु कोणाच्याही मनात नसावा. शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे. म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे", असंही शिंदे म्हणाले.