इन्स्टाग्रामवर प्रेम, पतीची अडचण! पत्नी आणि प्रियकरानं मिळून काटा काढला, पण एका चुकीमुळे पकडे गेले

मुंबई तक

समीर 31 मार्चपासून बेपत्ता होता, तर मीरा देखील त्याच दिवशी गायब झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मोबाइल लोकेशनने सगळ्या गोष्टी उघड केल्या.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Crime News : प्रेम प्रकरणातून घडणारे अनेक गुन्हे आपल्या समोर येत असतात. अशाच एका घटनेत एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. या भयानक कटाची सुरुवात सोशल मीडियापासून झाली. पत्नी मीराचा इन्स्टाग्रामवर एटा येथील रिंकूसोबत प्रेमाचे सूत जुळले. पती समीरला हे कळल्यानंतर त्यांनी याला विरोध केला. त्यावेळी पत्नी आणि प्रियकरने मिळून त्याला ठार मारण्याचा कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी समीरच्या वहिनीने पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली. यामध्ये तिने मीरावर परपुरुषाशी संबंध ठेवले असल्याचा आरोप केला. तसंच समीर बेपत्ता करण्यातही तिचाच हात असल्याचा आरोप केला. 

हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवर हवा करण्यासाठी पठ्ठ्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारालाच धमकी दिली, प्रकरण काय?

समीर 31 मार्चपासून बेपत्ता होता, तर मीरा देखील त्याच दिवशी गायब झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मोबाइल लोकेशनने सगळ्या गोष्टी उघड केल्या. समीर, मीरा आणि रिंकू यांचं शेवटचं लोकेशन हाथरसच्या सिकंदराराऊ येथे आढळलं. 

1 एप्रिल रोजी तिथल्या महामार्गावर एक अज्ञात मृतदेह आढळला होता, त्याची ओळख न पटल्याने त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. पोलीस तपासात तो मृतदेह समीरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं मीराने रिंकू आणि त्याचा मावस भाऊ नीलेश यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला. 

आरोपींनी 31 मार्च रोजी समीरला एटाला नेऊन त्याला बीअर पाजली. दारूच्या नशेत त्याला दगडाने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह महामार्गावर फेकून अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला.

हे ही वाचा >> पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना मृत्यू झालेल्या आदिल सय्यदच्या कुटुंबाच्या मदतीला धावले DCM शिंदे

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, मीरा आणि रिंकू गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. समीरने मीराला प्रियकराला भेटण्यास मज्जाव केल्याने दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला. 30 मार्च 2025 रोजी समीरचा भाऊ सुशील कुमार याने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. 

पोलीस तपासात मीराचा रिंकू चौहानशी दोन वर्षांपासून इन्स्टाग्रामद्वारे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. याच प्रेमप्रकरणातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनी मीरा, रिंकू आणि नीलेश यांना अटक केली आहे. हत्येत वापरलेला दगड, मोबाइल लोकेशनच्या आधारे घटना स्पष्ट झाली. अटक केलेला प्रियकर रिंकूने गुन्हा कबूल केला असून, मीराशी लग्न करण्याच्या इच्छेमुळेच हत्येत सहभाग घेतल्याचे त्याने सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp