Mumbai Tak Chavadi: 'त्याच दिवशी कळेल अजित पवारांना सोबत घेणं ही चूक होती की नाही...', भाजप आमदाराचं मोठं विधान
Atul Bhatkhalkar Mumbai Tak Chavadi: अजित पवार यांनी भाजपने सोबत घेणं ही राजकीय चूक होत की नाही हे निकालाच्या दिवशी समजेल असं विधान अतुल भातखळकर यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना केलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकरांचं मोठं विधान
पाहा अजितदादांना सोबत घेण्याबाबत काय म्हणाले भातखळकर
पाहा मुंबई Tak चावडीवर भातखळकर काय-काय म्हणाले
Ajit Pawar and BJP: मुंबई: भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई Tak च्या चावडीवर अजित पवार यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. 'अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपची राजकीय चूक झालीए की नाही हे आपल्याला 23 तारखेला म्हणजे निकालाच्या दिवशीच कळेल.' असं विधान अतुल भातखळकर यांनी केलं आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ADVERTISEMENT
पाहा भाजप आमदार अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले:
प्रश्न: अजित पवारांना सोबत घेणं ही भाजपची चूक ठरली का? कारण त्यांच्याविरोधातच फडणवीसांनी विधानं केली होती. अशावेळी जनतेने भाजपला कोणत्या पार्श्वभूमीवर मतं द्यावीत?
अतुल भातखळकर: तुम्ही म्हणालात ते मुद्दे बरोबर आहेत. त्यात काही फार मोठी चर्चा किंवा विरोध करण्याचं कारण नाही. हे आम्ही सांगितलंच आहे की, अजित पवारांना सोबत घेणं ती एक आमची राजकीय खेळी होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Nawab Malik : निवडणुकीच्या तोंडावर मलिकांना धक्का, 'या' गोष्टीवर आक्षेप घेत ईडीकडून न्यायालयात याचिका
प्रश्न: ती राजकीय चूकही ठरू शकते का?
अतुल भातखळकर: चूक होती की नाही.. हे आपल्याला 23 नोव्हेंबरच्या निकालातच कळणार आहे. पण नेतृत्वाने एक निर्णय घेतला आहे. ती राजकीय खेळी होती. शिवसेनेची युती आमची वर्षानुवर्षेची होती. त्याला वैचारिक पाया होता. पण त्याव्यतिरिक्त आम्ही राजकीय चाल खेळली का? तर हो खेळली.. हे आम्ही मोकळेपणाने मान्य करतो. आता लोकांनी काय विचार करायचा, लोकांनी कोणाला मतदान करायचं हा लोकांचा निर्णय आहे. ते सर्वश्रेष्ठ असतात.
ADVERTISEMENT
आम्ही आमचे सगळे मुद्दे घेऊन लोकांसमोर जातो. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर काम करणारं आमचं सरकार आहे. महाराष्ट्राचं व्हिजन आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे. हे कोणीही मान्य करेल भाजप सरकारच्या कालखंडात आम्ही मुंबईसह महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही केलं.
ADVERTISEMENT
आम्हाला अपेक्षा आहे की, आशा आहे की, लोकं आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला निवडून देतील. असं भातखळकर म्हणाले.
प्रश्न: भाजपचं असं नेतृत्व पाहिलं आहे की, तोडफोड करून बनवलेल्या सत्तेला मी शिवणार देखील नाही. अटलबिहारीचं ते प्रसिद्ध भाषण आपण पाहिलंय. तर दुसरीकडे एक नेतृत्व असं आहे की, ते म्हणतं की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आलोय...
अतुल भातखळकर: अटलजी असं बोलले होते का? तर बोलले होते. ते 13 दिवसाचं आमचं जे पहिलं सरकार आलं होतं 1996 साली त्यावेळेच्या राजीनाम्याच्या भाषणात अटलजी असं बोलले होते.
पण तुम्ही आता जे उदाहरण देत आहात मुळात पूर्णत: वेगळं उदाहरण आहे. 2019 साली आम्ही एकत्रित निवडणुका लढवल्या. 4 सभांमध्ये मोदीजी आणि सगळ्यांनी सांगितलं की, देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होतील.
हे ही वाचा>> Maharashtra Vidhan Sabha : राज्याची विधानसभा निवडणूक 'या' 5 मुद्द्यांभोवती फिरणार, कुणाला फटका बसणार?
जनतेचा विश्वासघात केला. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला बहुमत दिलं. जनेतेशी विश्वासघात करून त्यांनी काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं. त्यांच्या पक्षाने उठाव केला ते आमच्यासोबत आले. यात तोडफोडीचा काय मुद्दा?
यात कुठला पक्ष फोडला आम्ही? कुठलाच पक्ष फोडला नाही. अजित पवारांनी जाहीर सांगितलं.. 2017 पासून शरद पवार भाजपसोबत कसे येण्याकरिता प्रयत्न करत होते. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. यात तोडफोड करण्याचा मुद्दा कुठेय?
फडणवीस हे काही त्या अर्थाने तोडफोड केली असं काही म्हणाले नव्हते. शिवसेनेची आणि भाजपची तर नैसर्गिक युती होती. असं म्हणत भातखळकर यांनी फडणवीसांच्या त्या विधानाची पाठराखण केली.
ADVERTISEMENT