Sachin Sawant : मालिकेतून महायुतीचा प्रचार? मराठी वाहिनीवर गंभीर आरोप, कारवाईची मागणी
सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांनुसार थेट टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार केल्या जात असल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
काँग्रेस नेते सचिन सावंतांचे गंभीर आरोप
"टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार होतोय"
सचिन सावंत पुरावे घेऊन निवडणूक आयोगात
Maharashtra Vidhan Sabha Elections : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे प्रचारासाठी सध्या सर्वच पक्ष दंड थोपटून मैदानात उतरलेले आहेत. मात्र एका नवा प्रकार समोर आला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एका टीव्ही मालिकेतून एक गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Devendra Fadnavis : "आर. आर. आबांना दोष देणं अयोग्य, पण...", दादांच्या दाव्यावर फडणवीस सविस्तर बोलले
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यामाध्यमातून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये छुप्या पद्धतीनं महायुतीच्या जाहिराती केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहेत. सचिन सावंत यांनी तसे काही व्हिडीओ देखील आपल्या ट्विटमध्ये शेअर केले आहेत. ज्यामध्ये मालिकेच्या सिनदरम्यान, एका सिनवरून दुसऱ्या सिनवर जाताना मध्चे काही क्षण जाहिरातीचा फलक दिसला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
निवडणूक काळात प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात असताना आपण पाहत असतो. रॅली, सभा, चिन्ह, फलक, जाहिराती, पेपरवरील जाहिराती असे वेगवेगळे प्रकार आपण प्रचारादरम्यान पाहत असतो. पण आता सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांनुसार थेट टीव्ही मालिकेतून प्रचार केल्या जात असल्याचं दिसतंय.
सचिन सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय?
सचिन सावंत यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. मालिकेच्या काही भागांचे व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलंय की, "महायुतीने छुप्या जाहिराती करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या "घरोघरी मातीच्या चुली" या मालिकेत दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी प्रक्षेपित आणि १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता व ४ वाजता पुन: प्रक्षेपित भागात खुलेआम महायुतीच्या (शिंदे सेनेच्या)जाहिरातीचे चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. त्याच पध्दतीने "प्रेमाची गोष्ट" व इतरही मालिकांमध्ये ही जाहिरात चित्रांकीत करण्यात आली आहे. एका सिनवरून दुसऱ्या सीनवर जाताना ही जाहिरात दाखवली जात आहे. निवडणूक आयोगापासून हे लपवून केले जात आहे. विशेष म्हणजे डिस्ने हॉट स्टार वर या चॅनल मधील या मालिकेचे भाग दिसतात पण कुठही रेकॉर्ड राहू नये म्हणून तीथे जाहिरातींचा भाग दडवण्यात आला आहे.संविधान, लोकशाही, निवडणूक आयोग यांची तमा तर यांना नाहीच पण नैतिक पातळीवर ही यांचे अध:पतन झाले आहे. अशा किती कुटील क्लुप्त्या यांनी वापरल्या आहेत हे निवडणूक आयोगाने शोधून काढले पाहिजे."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सचिन सावंत यांनी याप्रकरणाचा निषेध करत यावर कारवाई करावी अशी मागणीही निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच या 'स्टार प्रवाह' या चॅनलवरही कारवाई केली पाहिजे अशीही मागणी केली. इतर वाहिन्यांवर असाच प्रकार घडला असल्याची दाट शक्यता आहे. मी स्वतः पेनड्राईव सहित पुरावा घेऊन आज १२ वाजता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे व तक्रार दाखल करणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT