Sanjay Raut : लाडक्या बहिणींना पैसे काय मोदी, शाह, फडणवीस, शिंदेंच्या... महाडिकांच्या वक्तव्यावर राऊत भडकले
धनंजय महाडिक यांनी काल कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलत असताना केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
धनंजय महाडिक यांचं वादग्रस्त वक्तव्य
संजय राऊत यांची महाडिकांवर सडकून टीका
मोदींपासून ते शिंदेंपर्यंत... भाजपचे नेते राऊतांच्या निशाण्यावर
Sanjay Raut on Dhananjay Mahadik : नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या घरातून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे येत नाहीत, शेती विकून लाडकी बहीणमध्ये पैसे टाकले नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. महिलांना माहिती आहे हा तीन महिन्यांचा खेळ आहे, त्यामुळे महिला दुर्लक्ष करत आहेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. धनंजय महाडिक यांनी काल कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन सध्या त्यांच्यावर टीकेचा भडिमार होतो आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Dhananjay Mahadik : लाडक्या बहिणींना थेट धमकी? धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेस रॅलीत महिला दिसल्या तर त्यांचे...
लाडकी बहीण योजना म्हणजे 1500 रुपयांमध्ये मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. सरकार कुणाच्या बापाचं नाही, सरकार जनतेचं असतं, हे वक्तव्य करणाऱ्यांनी आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात, किती पक्ष बदललेत, आपला इतिहास पाहिला पाहिजे. सरकार कोणत्या पक्षाचं नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या घरातून पैसे येत नाहीत, शेती विकून लाडकी बहीणमध्ये पैसे टाकले नाहीत. हे पैसे आमच्या करातून आलेले आहेत, आमचेच पैसे आम्हालाच देतायत, दादागिरी कुणाला करता? 1500 रुपये काय फार मोठी रक्कम नाही. निवडणूक काळात महिलांना अशा धमक्या दिल्या जातील, पण महिलांना माहिती आहे की हा तीन महिन्यांचा खेळ आहे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी महालक्ष्मी योजनेबद्दल बोलताना सांगितलं की, लाडक्या बहिणींना सरकार 1500 रुपये देतंय, पण 1400 रुपयांना गॅस सिलेंडर मिळतंय. त्यामुळेच आम्ही महालक्ष्मी योजना 3000 रुपयांचे केली आहे असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसकडूनही महाडिकांवर टीका
धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. "भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी दिसल्या तर त्याचा फोटो काढून व्हिडिओ बनवा. मग मला त्यांची नावे पाठवा. मी त्या महिलांना धडा शिकवतो. भाजपचा एक खासदार खुल्या व्यासपीठावरून महिलांना गुंडांप्रमाणे धमकावत आहेत. हीज भाजपची खरी रणनीती आणि हेच चारित्र्य असल्याचा हा पुरावा आहे. भाजप फक्त महिलांचा आदर करण्याचं नाटक करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. महिलांना धडा शिकवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल." असं म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT