Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना मविआच्या बाहेर पडणार? राऊत-दानवेंची वेगवेगळी मतं? काय म्हणाले ऐका!
Ambadas Danve and Sanjay Raut : राज्यात विधासनभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गोटात स्वतंत्र लढण्याची चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिवसेना यापुढे स्वतंत्र लढणार?
काय म्हणाले संजय राऊत?
अंबादास दानवे, संजय राऊतांची वेगळी मतं?
Maharashtra Politics : राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीने तब्बल 233 पर्यंत मजल मारत महाविकास आघाडीला अक्षरश: धूळ चारली आहे. मात्र याचवेळी महाविकास आघाडीकडून राज्यातील या निकालामध्ये इव्हीएमची मोठी भूमिका असल्याचं म्हणत गंभीर आरोप केले आहेत. तर महायुतीने आपलं मायक्रो मॅनेजमेंटच या यशाचं कारण असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या पराभवावर विचारमंथन करताना वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. इव्हीएमसोबतच ठाकरेंच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांकडूनही स्वतंत्र लढण्याची भावना व्यक्त करण्यात आल्याचं काल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले होते. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र संजय राऊत यांनी आज अशा सर्व चर्चा आणि शक्यता नाकारल्या आहेत. तसंच हा काही लोकांच्या वैयक्तिक भूमिका असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Amit Shah Vinod Tawde Meeting : भाजप हायकमांड देणार धक्का? दिल्लीत अमित शाह-तावडेंच्या भेटीनं चर्चा
उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशा सर्व शक्यता संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात नाकारल्या आहेत. राज्यातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पराभवाचा विचार केल्यास, पराभवाच्या कारणांची दिशा इव्हीएम आणि पैसे वाटपाच्या दिशेने जाते आहे. त्यामुळे आम्हाला एकत्र बसून हा निर्णय घ्यावा लागेल असं संजय राऊत म्हणाले. तसंच ते म्हणाले की, राजकारणात एवढे घाईने निर्णय घ्यायचे नसतात. लोकसभेला महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला, जे लोक पराभूत झालेत त्यांना वाटतं की, आपण वेगळं लढलं पाहिजे. त्यामुळे कुणी वेगळं व्हायचं म्हणत असेल तर त्या त्यांच्या वैयक्तिक भूमिका आहेत असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा >>Shrikant Shinde : "पण शिंदे साहेब अपवाद ठरले...", मोदी-शाहांचा उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची बापासाठी भावनिक पोस्ट
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेत आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेने स्वतंत्र लढलं पाहिजे असा बऱ्याच लोकांचा सूर आहे असं अंबादास दानवे म्हणाले. शिवसेनेचा एक विचार आहे, शिवसेना फक्त सत्तेसाठी नाही, सत्ता ही शिवसेनेला मिळणारच आहे असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. कार्यकर्ते भावना व्यक्त करत असतात, ते नेत्यांनी ऐकलं पाहिजे. ही भावना नेत्यांनी ऐकली आहे असं दानवे म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT