Kalamnuri Vidhan Sabha : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना धक्का, पैसे वाटल्याच्या आरोपात आमदारावर गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का

point

आमदारावर पैसे वाटल्याच्या आरोपात गुन्हा दाखल

point

कळमनुरी मतदारसंघात तुफान राडा

kalamnuri Vidhan Sabha : विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असून, त्यासाठी आता  सगळेच पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत.  यावेळी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभणं देण्याचाही प्रयत्न होतो. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या एका आमदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजी माने यांनी केलेल्या आरोपांनंतर आता संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Pankaja Munde : 'कटेंगे तो बटेंगे' घोषणेची महाराष्ट्रात... पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची चर्चा, नेमकं काय म्हणाल्या?

 

हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघात यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलाच राडा सुरू असल्याचं दिसतोय. काल वाकोडी गावांमध्ये ठाकरे गटाची प्रचारा साठी गेलेली गाडी फोडल्यानं राडा झाला. त्यानंतर आता ठाकरे गटाने महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी माने यांनी आमदार बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी  पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.आमदार बांगर यांच्या फॉर्महाऊस जवळ मागच्या चार दिवसांपासून कोणतीही परवानगी नसताना मंडप टाकून साऊंड सिस्टिम लावून बेकायदेशीररित्या लोकांना जमा करत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीवरुन संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Priya Sarvankar Vs Amit Thackeray : नेता म्हटलं तर कर्तृत्व, वकृत्व, नेतृत्व हवं, नवा चेहरा द्यायला हा सिनेमा आहे का?

काल दुपारी तीन ते चार वाजताच्या सुमारास वाकोडी गावाजवळ कारखान्याच्या बाजूला असलेल्या माळरानावर अंदाजे 2000 च्या वर महिला एकत्र जमवून संतोष बांगर व त्यांचे कार्यकर्ते सदर महिलांना मतदानासाठी पैसे वाटप करत आहेत अशी तक्रार करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीवरुन संतोष बांगर यांच्याविरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT