Uddhav Thackeray : शिंदे गटातील आमदारांना पक्षात घेणार का? ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई तक

Uddhav Thackeray News : तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील. मंगळसुत्र उचलून नेतील. तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमची म्हैस चौरून नेतील,नकली संतान, नकली सेना हे काय खरे नरेटिव्ह होतं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केला.

ADVERTISEMENT

वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
will eknath shinde take back into the party udhhav thackeray reaction on maha vikas aghadi meeting y b center
social share
google news

Uddhav Thackeray On Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. यातूनच आता शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना परत पक्षात घेणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. नेमकं उद्धव ठाकरे यावर काय म्हणाले आहेत. हे जाणून घेऊयात. (will eknath shinde take back into the party udhhav thackeray reaction on maha vikas aghadi meeting y b center) 

 वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पत्रकारांनी शरद पवारांना अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेणार का असा सवाल केला होता? यावर शरद पवारांनी प्रश्नच येत नाही, असं स्पष्ट उत्तर दिलं होतं.  पत्रकाराच्या याच प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी देखील उत्तर दिलं.  मला सोडून गेलेल्यांना मी अजिबात परत घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

हे ही वाचा : T20 World Cup: पाकिस्तानचा झाला करेक्ट कार्यक्रम! अमेरिकेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

पंतप्रधान मोदींना घेरलं 

उद्धव ठाकरे म्हणाले,  वोट जिहाद म्हणजे काय? नरेंद्र मोदींनी सांगितलं त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सानिध्यात गेलं. त्यांच्या घरचे जेवण ते जेवायचे. आता ते खाल्ल्या मिठाला जागले आहेत की नाही हे मोदींनी सांगावं? लहाणपणी ते शेजारच्या कुटुंबियांकडे जेवण जेवत असतील तर त्या खाल्ल्या मिठाला जागलेत की जागणार आहेत की नाही, अशा शब्दात ठाकरेंनी मोदींना घेरलं. 

ठाकरेंनी यावेळी नरेटिव्हच्या मुद्यांवरून देखील भाजपवर हल्ला चढवला. तुमची संपत्ती जास्त मुलं होणाऱ्यांना वाटतील. मंगळसुत्र उचलून नेतील. तुमच्या घरातले नळ कापून नेतील, तुमची म्हैस चौरून नेतील,नकली संतान, नकली सेना हे काय खरे नरेटिव्ह होतं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला केला. 

हे ही वाचा : शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, जप्त केलेली हाडे आणि अवशेष गायब

दरम्यान महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp