नाशिकमध्ये 'मशाल' पेटली! "शिंदे फितूर आणि गद्दार, तर भाजप...", AI बाळासाहेबांचं भाषण वाचा जसच्या तसंं
AI Balasaheb Thackeray Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज नाशिकमध्ये संपन्न झाला. यावेळी शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नाशिकमध्ये पार पडला शिवसेनेचा निर्धार मेळावा

AI बाळासाहेबांच्या भाषणातून भाजप, शिंदे गटावर निशाणा

AI बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडीओ एकदा पाहाच
AI Balasaheb Thackeray Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आज नाशिकमध्ये संपन्न झाला. यावेळी शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली. तत्पूर्वी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं AI जनरेटेड भाषण दाखवण्यात आलं. AI च्या मदतीनं बनवण्यात आलेल्या व्हिडीओत बाळासाहेबांच्या आवाजात भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली. या भाषणात AI बाळासाहेबांनी विरोधकांवर कशाप्रकारे टीकास्त्र डागलं, जाणून घेऊयात.
AI च्या मदतीनं बनवलेलं भाषण जसच्या तसं
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..आज तुफान गर्दी दिसतेय. अरे जातील तिथे गंडवायचे आणि लोकंही गंडतात. ही नाती जपणारी माणसं नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग..भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते. तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा..आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं. पण आत्ता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. 25 वर्ष आमचं हे एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होतं. अर्थात हिंदूत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले. बरोबर ना? काय..मग नातं तोडलं कोणी? माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत.
हे ही वाचा >> SSC And HSC Result 2025 : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट
हळूहळू काढतो हो..त्यातच मजा असते. अहो त्या भाजप आणि नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली. लोकशाहीमध्ये असे निकाल जबरदस्तीने लावले जात असतील, तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय? ही लोकशी आम्ही मान्य करणारच नाही. हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कुणाच्या पाठीत वार करणार नाही. पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरु आहेत. तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी, शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही".
हे ही वाचा >> Majhi Ladki Bahin: तब्बल 7 लाख लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपयेच का मिळणार?
माझी शिवसेना हे कुटुंब आहे आणि राहील. महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाराने शिवसेना तोडली. निष्टावंत म्हणवून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले. ते गद्दार दिल्लीपुढे मुजरेच झाडतायत. त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले. अहो ते गद्दार गेले ते गेले. त्यांना पैसा अडका, मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज मिळाल्यात हो. पण इतिहासात तुमची नोंद फितूर आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार.गंगेत किती डुबक्या मारल्यात, तरी हे पाप आणि गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही. या गद्दारांनी जीवंतपणी माझ्या पाठीवर वार केलेच. पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरुच आहे, असं म्हणत AI बाळासाहेबांच्या भाषणातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.