Crime : दुहेरी हत्याकांडाने नगर हादरलं! मायलेकाला कारने चिरडून संपवलं, शेजाऱ्याने हत्या का केली?
अहमदनगरच्या पारनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येनारे आणि श्रीमंदिलकर हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबियांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.
ADVERTISEMENT
Ahmednagar Crime News : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका मायलेकाला कारने चिरडून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. शीतल येनारे आणि स्वराज येनारे असे मृत मायलेकाचे नाव आहे. जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरला आहे. (Ahmednagar crime news mother and children killed crushing car new shocking crime)
ADVERTISEMENT
अहमदनगरच्या (Ahmednagar) पारनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. येनारे आणि श्रीमंदिलकर हे कुटुंब शेजारी शेजारी राहतात. या दोन्ही कुटुंबियांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. घराशेजारी असलेल्या जागेच्या मोजणीच्या मुद्यावरून त्यांच्यात भांडण देखील झाले होते. याच भांडणातूनच हे दुहेरी हत्याकांड घडलंय.
हे ही वाचा : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’…’ ठाकरेंचा सामनातून PM मोदींवर हल्लाबोल
गुरूवारी संध्याकाळी शीतल येनारे त्याचा चिमुकला स्वराजला घराबाहेर जेवण भरवत होत्या. त्याचवेळी आरोपी कार घेऊन त्यांच्या घराजवळ आला. यावेळी आरोपीने थेट शीतल येणारे आणि स्वराजवर कार घालून त्यांची चिरडून हत्या केली. दोघांच्या आरडाओरडा ऐकूण शीतलच्या सासू चंद्रकला बाहेर आल्या होत्या. त्यावेळी शीतल आणि स्वराज रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
हे वाचलं का?
या घटनेनंतर सासू चंद्रकला येनारे यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मायलेकाला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना नगरमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. यावेळी उपचारादरम्यान शीतल यांचा गुरूवारी रात्री 9 वाजता तर स्वराजचा मध्यरात्री एक वाजता मृत्यू झाला.
हे ही वाचा : Rupali Chakankar : ‘ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात…’ ,अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर आरोपी किरण अद्याप फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली असून मायलेकाच्या मृत्यमुळे लोकं हळहळ व्यक्त करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT