BMC : ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ गोष्टी पाळाव्या लागणार; पोलिसांचा इशारा काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shiv Sena UBT Morcha on BMC : Police give permission with conditions to Thackeray.
Shiv Sena UBT Morcha on BMC : Police give permission with conditions to Thackeray.
social share
google news

मुंबई महापालिकेच्या कामात नियमांचं पालन न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा (युबीटी) मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानगी दिली असून, त्यासाठी नियम घालून दिले आहेत. नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी मोर्चा काढताना कोणते नियम घालून दिले?

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचा मोर्चा 1 जुलै रोजी दुपारी 2 वाजता वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो सिनेमा) येथून सुरूवात होऊन महानगरपालिका मार्गावरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत आयोजित केला असून, सदर ठिकाणी सभा सुद्धा होणार आहे. या दोन्हीही गोष्टी अतिशय शांततेने पार पाडावे.

– मोर्चा दिलेल्या मार्गावरुनच नेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत मार्ग बदलू नये. मोर्चा निघाल्यानंतर मार्गावर रेंगाळत ठेवू नये.

हे वाचलं का?

– आयोजित कार्यक्रमापूर्वी आवश्यक असलेल्या इतर शासकीय विभागाचे आवश्यक ते परवाने प्राप्त करावेत. तसेच आपले तर्फे उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबंधित ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम स्टेज स्टॅबिलिटी प्रमाणपत्र प्राप्त करुन सदरचे सर्व परवाने आझाद मैदान पोलीस ठाणे येथे कार्यक्रमापूर्वी सादर करावेत.

– सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या समुदायाच्या धार्मिक / जातीय / सामाजिक / राजकीय भावना दुखावल्या जातील, अशा आक्षेपार्ह प्रतिमांचे, देखाव्यांचे, बॅनरचे प्रदर्शन करणे, घोषणा देणे, आक्षेपार्ह व अश्लील गाणे अथवा वाद्य वाजविणे किंवा तत्सम प्रकार करता येणार नाहीत. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जातांना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.

– मार्चमध्ये बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गाने प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्यात. वाहनांनी शहरात प्रवासादरम्यान त्या त्या रस्त्यावर विहित वेग मर्यादेचे पालन करावे. मार्चमध्ये आलेल्या नागरिकांना त्यांचे वाहने (दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन) पार्किंगसाठी निर्धारित केलेल्या ठिकाणीच पार्किंग करण्याच्या सूचना द्याव्यात.

ADVERTISEMENT

– मार्चासाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून, आयोजकांनी त्यांच्या मोर्च्याच्या तसेच सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये

ADVERTISEMENT

– मोर्च्याच्या दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, लाठी, पुतळे इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करू नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.

– सभेचे ठिकाणी पुरेसे अग्निशमन दल हजर राहील याची दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाणी महानगर पालिकेशी संपर्क साधून अग्निशमन यंत्रणा व आवश्यक Portable Fire Extinguisher यंत्र राहतील याची दक्षता घ्यावी.

– सभेच्या ठिकाणी रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी. तसेच तात्पुरते वैदयकीय सेवा, वैदयकीय अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थेचे आयोजन करावे.

– सभेकरीता येणाऱ्या जनसमुदायमध्ये महिलांचा देखील समावेश राहणार आहे. त्यामुळे महिला सुरक्षेबाबत योग्यती खबरदारी घेऊन महिलांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

– सभेदरम्यान ध्वनिक्षेपणाचा आवाज मर्यादित ठेवावा. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपणाबाबत दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालण करावे. ध्वनिप्रदुषण (नियम व नियंत्रण) अधिनियम 2000 अन्वये आवाजाची पातळी खालील नमुद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असु नये. सदर मर्यादिचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदुषण (नियम व नियंत्रण) अधिनियम 2000 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

– सभा कार्यक्रमात डीजे व बिम लाईटचा वापर करू नये. ध्वनिक्षेपकाची परवानगी ज्या ठिकाणाकरीता देण्यात आली आहे. त्याच ठिकाणाकरिता ध्वनीक्षेपणाचा वापर करण्यात यावा.

– रुग्णालये, सरकारी दवाखाने, शाळा, कॉलेज अथवा कामाचे दिवशी सरकारी कचेऱ्या / न्यायालये तसेच प्रतिबंधीत क्षेत्रा जवळ ध्वनीक्षेपकाचे मयदिचे योग्य पालन करावे.

– सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी मुंबई शहराच्या बाहेरुन निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांच्या वाहनांची शहर अनुसरुन संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहिती सभेच्या एक दिवस अगोदर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे यांच्याकडे द्यावी.

– सभा स्थानाच्या कमाल मर्यादिपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास आयोजकांना जबाबदार धरले जाईल.

– सदर कार्यक्रमा दरम्यान कुठल्याही अत्यावश्यक सुविधा उदा. शहर बस सेवा, अॅम्बुलन्स, दवाखाना, मेडिकल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळण-वळण यांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

– सभेसाठी वापरण्यात येणारी विद्युत यंत्रणा, बॅरिकेट्स, मंडप, ध्वनिक्षेपक सुस्थितीत असल्याची खात्री करावी व विदयुत यंत्रणेमध्ये काही बिघाड झाल्यास पर्यायी विद्युत यंत्रणेची (जनरेटरची ) व्यवस्था अगोदरच करावी.

– सभेचे ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिलेल्या सुचनांचे, निर्देशांचे, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची आयोजकाने दक्षता घ्यावी.

-मोर्चा दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबींचे पालन करावे.

– सदर परवानगी पत्र कार्यक्रमाचे वेळी सोबत बाळगावे व कर्तव्यावरील पोलीस अधिकारी यांनी मागणी केल्यास त्यांचे समक्ष सादर करावेत.

– सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी आयोजक जबाबदार राहतील याची महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३) अन्वये अचानक उद्भवलेल्या व उद्भवनाच्या तात्कालीन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोर्चा / सभेस देण्यात आलेली परवानगी केव्हाही रद्द करण्याचा अधिकार, परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना राहील.

– वरील सर्व अटी व शर्तीबाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना कळविण्याची व सदर अटी व शर्तीचे तंतोतत पालन मोर्चामधील सर्वजण करतील याची जबाबदारी आयोजकांवर राहील.

– कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांनी संपूर्ण कालावधीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे आक्षेपार्ह अथवा भावना भडकवणारे वक्तव्य / घोषणाबाजी करू नये किंवा आक्षेपार्ह फलक प्रदर्शित करू नये ज्यामुळे उपद्रव निर्माण होईल.

– या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कालम 134 व 135 प्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT