चिंताजनक… दिल्लीत कोरोनाचं सावट, महाराष्ट्रात वाढला मृतांचा आकडा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Corona death toll has increased in Maharashtra
Corona death toll has increased in Maharashtra
social share
google news

Corona Update : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत (Delhi) कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना (corona) संसर्गित रूग्णांचा आकडा 200 च्या पुढे गेला असून संसर्गाचा दर 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५० रुग्ण आढळून आले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील (maharashtra) परिस्थिती चिंताजनक होत आहे. (corona in delhi death rate increased in maharashtra)

ADVERTISEMENT

दिल्लीच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना रूग्णांच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टरांनीही लोकांना कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Daya Nayak पुन्हा मुंबई पोलीस दलात… हॉटेल कामगार ते एन्काउंटर स्पेशालिस्ट, असा झाला प्रवास

भारतातील ‘या’ महत्त्वांच्या राज्यांमध्ये कोरोनाचे वाढते संकट!

गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाची 214 नवीन प्रकरणं समोर आली. चिंतेची बाब म्हणजे रूग्णांचा दर 11 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. एक रूग्ण रूग्ण पुढे 11 लोकांपर्यंत हा संसर्ग पसरवत आहे. तसंच, दिल्ली व्यतिरिक्त महाराष्ट्रातही कोरोना झपाट्याने पसरतोय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 450 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनामुळे मृत्यूही होऊ लागले आहेत. मंगळवारी (28 मार्च) महाराष्ट्रात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

हे वाचलं का?

Savarkar row : सावरकर वाद महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतो? समजून घ्या 5 मुद्द्यांमध्ये

डॉक्टरांचं म्हणणं काय?

कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. मास्क वापरणे खूप महत्वाचे झाले आहे. कोरोनाला सामान्यपणे घेऊ नये. वृद्ध व्यक्ती किंवा कोणत्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना धोका असू शकतो.

ज्या शाळेत शिकली तिथल्याच मुलांना केलं ठार, कोण होती हल्लेखोर ट्रान्सजेंडर?

अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या एक्सबीबी.1.16 व्हेरिएंटमुळे प्रकरणं वाढत आहेत. हे व्हेरिएंट वेगाने पसरत आहे आणि लोक संसर्गित होत आहेत. या व्यतिरिक्त हवामानात बदल झाला आणि लोकांचा निष्काळजीपणा हे ही संसर्ग वाढण्याचं मोठं कारण आहे. याबाबतची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT