रिक्षात अश्लील चाळे; प्रेमी युगुलाला हटकलं, प्रियकराने टाकला रिक्षा चालकाच्या डोक्यात दगड अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pune Murder: पिंपरी-चिंचवड: रिक्षात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला (Couple) हटकले म्हणून रिक्षा चालकाची (Auto Driver) प्रेमी तरुणाने हत्या (Murder) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यात (Pune) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळं पुण्यातील दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अलीम इस्माईल शेख (वय 45 वर्ष) असं हत्या झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याच हत्येप्रकरणी आरोपी अमित बाळासाहेब कांबळे (वय 28 वर्ष) आणि सागर माने या दोघांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल (19 मार्च) सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या दापोडीत ही खळबळजनक घटना घडली आहे. डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू घालून ही निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (lover couple who was doing obscene antics in a rickshaw got away the boyfriend threw stone on rickshaw drivers head and killed him in pune)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी भागातील गणेश नगर परिसरात ही हत्या करण्यात आली. आरोपी अमित कांबळे हा एका रिक्षात बसून आपल्या प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत होता. याचवेळी रिक्षा चालक अलीम शेख हा तिथे आला आणि त्यांनी रिक्षात बसलेल्या या जोडप्याला हटकलं आणि त्याच्या अश्लील चाळे करत असल्याने खडसावलं. या गोष्टीचाच आरोपी अमितला प्रचंड राग आला. त्याने या मुद्द्यावरून अलीमशी जोरदार वाद घातला. याच दरम्यान त्याने आपला मित्र सागर माने याला बोलावून घेतलं.

यावेळी दोघांनीही रिक्षाचालक अलीमसोबत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र, या हात एवढा टोकाला पोहचला की, आरोपी अमित आणि सागर यांनी थेट रिक्षाचालक अलीमला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मारहाण करताना अमित आणि सागर यांनी अलीम याच्या डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टूच घातला. ज्यामध्ये अलीमचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपींनी तिथून लागलीच पळ काढला.

डोक्यात दगड टाकून 28 वर्षीय तरुणाची हत्या, मोबाइलवर बोलण्याच्या वादातून मित्राला संपवलं

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. ज्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासातच अमित आणि सागर या दोन्ही आरोपींना अटक केली. आता पोलीस याच प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Ulhasnagar: पत्नीशी अवैध संबंधाच संशय, मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या

ADVERTISEMENT

आरोपी आणि मृत रिक्षाचालक यांचा याआधीही काही वाद होता का? तसेच या हत्या प्रकरणात आरोपीच्या प्रेयसीची काय भूमिका होती? या सगळ्याची सध्या आता पोलीस चौकशी करत आहेत. अशी माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली आहे.

दुसऱ्याशी लग्न ठरल्याच्या राग, बेडरुममध्ये घुसून
प्रेयसीची हत्या; प्रियकराने स्वत:लाही संपवलं!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT