"जा..मोदीला जाऊन सांग...", दहशतवाद्यांनी पतीला मारलं ठार, पत्नीने सांगितला हल्ल्याचा A टू Z थरार!
Pahalgam Terrorist Attack Latest Update : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून 27 पर्यटकांना ठार मारल्याचं समजते. तर 10 हून अधिक पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

श्रीनगरच्या पहलगाममध्ये नेमकं काय घडलं?

पतीला केलं ठार, पत्नीने सांगितला दहशवादी हल्ल्याचा थरार

PM मोदींनी अमित शाहांना फोन केला आणि...
Pahalgam Terrorist Attack Latest Update : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून 27 पर्यटकांना ठार मारल्याचं समजते. तर 10 हून अधिक पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांचा पहलगामच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंजूनाथ त्याची पत्नी पल्लवी आणि छोट्या मुलासोबत पहलगामचं पर्यटन पाहायला गेले होते. परंतु, दहशतवाद्यांनी गोळीबार करून त्यांना ठार केलं. त्यानंतर दहशतवादी मंजूनाथ यांची पत्नी पल्लवीला म्हणाले, 'जा मोदीला जाऊन सांग...'
श्रीनगरच्या पहलगाममध्ये नेमकं काय घडलं?
मंजूनाथ यांची पत्नी पल्लवीने दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा थरार सांगत म्हटलं, आम्ही तीन लोक होते. मी, माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. मला वाटतंय की, हा हल्ला दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास झाला. आम्ही पहलगामला होतो. माझ्या डोळ्यासमोरच त्यांचा मृत्यू झाला. हे एक वाईट स्वप्नासारखं वाटतंय. हल्ला झाल्यानंतर लगेच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि तीन स्थानिक लोकांनी आमचा जीव वाचवला.
हे ही वाचा >> भयंकर... काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाडल्या गोळ्या, महाराष्ट्रातील जखमी पर्यटकांची यादी आली समोर!
दहशतवादी हिंदूंना निशाणा बनवत होते. तीन-चार लोकांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. मी त्यांना सांगितलं, मलाही मारून टाका. तुम्ही माझ्या पतीला आधीच मारलं आहे. त्यानंतर एका दहशतवाद्याने म्हटलं, मी तुम्हाला मारणार नाही. जा मोदीला जाऊन सांग.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी एक्सवर पोस्ट करून निषेध व्यक्त केला आहे.
त्यांनी म्हटलंय, या घटनेत कन्नड लोकांचा बळी गेला आहे. घटनेची माहिती मिळताच मी एक एमरजन्सी मिटिंग बोलावली. मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत घटनेची माहिती मिळवली. आम्ही घटनेवर बारकाईने नजर ठेवली आहे. शक्य तेव्हढी मदत केली जाईल. कर्नाटक सरकार पीडित लोकांच्या सोबत आहे.
हे ही वाचा >> Kashmir Pahalgam Terror Attack: सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातील किती जणांनी गमावले प्राण? एकूण 27 पर्यटक ठार
PM मोदींनी अमित शाहांना फोन केला आणि...
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरबच्या दौऱ्यावरून घटनेची माहिती मिळवली. मोदींनी गृहमंत्री अमित शाहा यांना तातडीनं फोन करून घटनास्थळाची पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अमित शाहा श्रीनगरमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत हाय लेव्हल मीटिंग केली.