Uddhav Thackery : सरन्यायाधीशांबद्दल बोलणं भोवणार, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray CJI Chandrachud : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यासाठी एका पत्रकाराने अॅटर्नी जनरलकडे परवानगी मागितली आहे. अॅटर्नी जनरलने परवानगी दिल्यास उद्धव ठाकरेंविरुद्ध अवमानना खटला चालवला जाऊ जाईल. (contempt case against uddhav thackeray)

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्याबद्दल केलेल्या विधानावर दिल्लीतील पत्रकाराने आक्षेप घेतला आहे. ठाकरेंनी दसरा मेळाव्यात बोलताना घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला होता. त्यावरूनच पत्रकार दीपक उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टाचा अवमानना केल्या प्रकरणी ठाकरेंविरुद्ध याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे.

उपाध्याय यांनी नेमकं काय म्हटलंय?

सुप्रीम कोर्टात अवमानना याचिका दाखल करण्यासाठी पत्रकार दीपक उपाध्याय यांनी अॅटर्नी जनरल वेंकटरामानी यांच्याकडे परवानगी मागितली आहे. त्यांनी अॅटर्नी जनरल यांना ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे इंग्रजीत भाषांतरीत करून (English transcription) सादर केले आहेत.

हे वाचलं का?

उपाध्याय यांनी त्यात म्हटलं आहे की, “एका राजकारण्याने अत्यंत अपमानास्पद आणि बदनामीकारक विधानं केली आहेत, ज्याचा उद्देश सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे आणि सरन्यायाधीश कार्यालयाला बदनाम करण्याचा आहे. त्यांची ही कृती अवमान करणारी आहे.”

“ठाकरेंची टिप्पणी वैयक्तिकरित्या सरन्यायाधीशांना लक्ष्य करणारी आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी दबाव आणणारी, तसेच सरन्यायाधीशांना विशिष्ट प्रकारे निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा न्यायालयाचा अपमान करण्याचा प्रयत्न असू शकतो आणि हा काही पीठांना प्रकरणांची सुनावणी घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांचे वक्तव्य न्यायालयीन स्वातंत्र्य आणि अखंडतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. कोणत्याही कल्पनेने वाजवी टीका करणे अथवा घटनेच्या अंतर्गत कोणत्याही नागरिकाला दिलेल्या स्वातंत्र्याद्वारे मत व्यक्त करण्याची ही प्रामाणिक अभिव्यक्ती मानली जाऊ शकत नाही,” असे उपाध्याय यांनी अॅटर्नी जनरल यांना केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंविरुद्ध अवमानना याचिका

“ठाकरे यांची कृती न्यायालयाचा अवमान कायद्यांतर्गत परिभाषित केल्यानुसार फौजदारी स्वरूपाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यास मी तुमची लेखी परवानगी मागतो”, असे उपाध्याय यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT