Aaditya Thackeray : "पक्ष आणि परिवार फोडणाऱ्यांचं कौतुक आम्ही कधीच करणार नाही"

मुंबई तक

आम्ही देवेंद्र फडणवीस यांची कामांसाठी भेट घेतली, पण त्यांचं कौतूक केलं नाही. जे पक्ष फोडतात, परिवार फोडतात त्यांचं कौतूक आम्ही कधी करणार नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर शिंदेंचं कौतुक केल्याबद्दल निशाणा साधला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या पवारांना निशाणा

point

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

point

ईव्हीएम आणि मतांच्या गोंधळावरुन निवडणूक आयोगाला सवाल

Aaditya Thackeray : "देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मतांचा गोंधळ, ईव्हीएमचा गोंधळ सुरूय. आमच्यासोबत जे झालं ते केजरीवाल यांच्यासोबत झालं, तेच उद्या बिहारमध्ये होऊ शकतं" असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. जिंकलेल्या लोकांच्या विजयात निवडणूक आयोगाचाही हात आहे, त्यामुळे हे सगळं लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढची दिशा ठरवण्याची तयारी सुरू आहे असं आदित्य ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी काल दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली असून, आज अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन, त्यांचीही भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. 

हे ही वाचा >> Bhaskar Jadhav : "जायचं त्यांना जाऊद्या म्हणण्यापेक्षा...", साळवींच्या निर्णयानंतर भास्कर जाधवांचा स्वपक्षीयांना सल्ला

सरकार येऊन अनेक महिने उलटले, मात्र अजूनही वेगवेगळे वादच सुरूय. आधी पालकमंत्रिपदाचा वाद, जॅकेटवरुन वाद असे वाद सुरूच आहेत. पक्ष फोडण्याचं काम सुरूय. शिवभोजन थाळी बंद केली, एसटीची भाडेवाढ केलीय. लहान मुलांच्या शालेय भोजनातून अंडी, खीर कमी केलीत.ते परत करा आणि मग ऑपरेशन टायगर करा, ऑपरेशन लोटस करा टोला आदित्य ठाकरेंनी मारला.

हे ही वाचा >>Nanded : मुख्यध्यापकाकडून गुंगीचं औषध देत अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची...

आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची कामांसाठी भेट घेतली, पण त्यांचं कौतूक केलं नाही. जे पक्ष फोडतात, परिवार फोडतात त्यांचं कौतूक आम्ही कधी करणार नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर शिंदेंचं कौतुक केल्याबद्दल निशाणा साधला. "तुम्ही महादजी शिंदेंच्या नावाने एकनाथ शिंदेंना पुरस्कार देऊन महादजी शिंदेंची प्रतिष्ठा तुम्ही कमी केली" असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

सरहद या संस्थेच्या वतीने महादजी शिंदे यांच्या नावानं दिलेला पुरस्कार यंदा एकनाथ शिंदे यांना दिला आहे. शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर ठाकरेंच्या गोटातून संताप व्यक्त होताना दिसतोय. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. हीच पक्षाची भूमिका आहे का? असं आदित्य ठाकरे यांना विचारलं असता, त्यांनी हीच आमची भूमिका असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp