अंकिता पाटील आणि निहार ठाकरेंची अशी झाली होती भेट…

मुंबई तक

महाराष्ट्राला राजकीय नेत्यांचे घरोब्याचे संबंध नवीन नाहीत. त्यातच आता आणखी एक घराणं जोडलं जाणार आहे, ते म्हणजे ठाकरे आणि पाटील! माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याची सून होणार आहेत. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे 28 डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहेत. अंकिता हर्षवर्धन पाटील सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राला राजकीय नेत्यांचे घरोब्याचे संबंध नवीन नाहीत. त्यातच आता आणखी एक घराणं जोडलं जाणार आहे, ते म्हणजे ठाकरे आणि पाटील!

माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याची सून होणार आहेत.

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे 28 डिसेंबरला विवाहबद्ध होणार आहेत.

अंकिता हर्षवर्धन पाटील सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे.

त्याचबरोबर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्येही शिक्षण घेतलेलं आहे. अंकिता पाटील शिक्षण घेत असतानाच्या काळातच निहार ठाकरेदेखील हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते.

तिथेच अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांची एकमेकांशी ओळख झाली.

अंकिता पाटील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बावडा लाखेवाडी गटातून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले, तरी अंकिता पाटील काँग्रेसमध्येच आहेत. असं असलं तरी 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या वडिलांनी म्हणजेच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्या काँग्रेसमध्ये फारशा सक्रिय नाहीत.

सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज उपयोगी आणि शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत.

नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या त्या सक्रिय सदस्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी अंकिता यांच्याकडे होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp