Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवलीतही पुण्यासारखीच कारवाई होणार, हजारो लोक होणार बेघर, प्रकरण काय?
Kalyan Dombivli Illegal Building: गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बरीच बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत. आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कल्याण डोंबिवलीमध्ये हजारो लोक होणार बेघर

न्यायालयाच्या आदेशानंतर होणार मोठी कारवाई

हजारो लोकांच्या डोळ्यात अश्रू, यंत्रणेवर कारवाई होणार का?
KDMC RERA Scam: कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत डोंबिवलीत जवळपास 6,500 लोक बेघर होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बनावट कागदपत्रे सादर करून महारेरा प्रमाणपत्र मिळलेले आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले 65 इमारतींमध्ये राहणारे हजारो लोकांच्या घरांवर कारवाई होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींच्या जमिनी हस्तांतरित केल्या जात आहेत. महापालिका आयुक्त इंदुराणी जाखर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.
हे ही वाचा >> Thane Crime News : गुंड कार घेऊन सोसायटीत घुसले, 8 जणांना उडवलं... ठाण्यात घडलेला प्रकार नेमका काय?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून बरीच बेकायदेशीर बांधकामं झाली आहेत. आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने 65 बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर डोंबिवलीतील साई गॅलेक्सी इमारतीजवळील बांधकाम करण्याचे कायम ठेवण्याची मागणी करणारी याचिका रहिवाशांनी न्यायालयात दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर लोकांच्या पदरी निराशाच पडली.
हे ही वाचा >> Crime : ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर महिलांनी फेकलं मिरची पूड टाकलेलं पाणी
मात्र, याप्रकरणी बिल्डर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही यावर लोकांनी संताप व्यक्त केला. रहिवासी म्हणतायत की, "आम्ही लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आहे. आमचं घर खरेदी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतलं आहे. आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला, आम्ही महानगरपालिकेला कर भरला आहे. पण आता इमारत अनधिकृत घोषित करून ती रिकामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्हाला फसवणारा बिल्डर निसटून गेला आहे." अशा भावना लोक सध्या व्यक्त करत आहेत.