Nagpur Car Accident : नागपूरमध्ये भरधाव कार विहिरीत कोसळली, दोन भाऊ आणि एका मित्राचा जागीच अंत...

मुंबई तक

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर गाडी बाहेर काढली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, तोपर्यंत तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये कार विहिरीत कोसळली

point

कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू

point

मृतांमध्ये दोन भाऊ आणि एक मित्र

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी भागात सोमवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: 'ते' CCTV फुटेज समोर येताच धनंजय देशमुख संतापले, म्हणाले पोलिसांना तर...

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार खूप वेगाने जात होती आणि अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं. त्याच वेगात गाडी विहिरीच्या सुरक्षारक्षक कठड्याला धडकली. कठडा तुटून कार थेट विहिरीत पडली. विहिरीत पाणी असल्याने गाडीतील तिन्ही तरुण बुडाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोघे भाऊ आणि एक मित्र

पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून, सूरज चव्हाण (34), त्याचा भाऊ साजन चव्हाण (28) आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण (27) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तिघंही स्थानिक रहिवासी होते आणि काही कामासाठी बाहेर पडले होते.

हे ही वाचा >> वडिलांना न सांगता चार्टर्ड फ्लाइटने बँकॉकला निघालेला तानाजी सावंतांचा मुलगा आहे तरी कोण?

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर गाडी बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. प्राथमिकत: असं  दिसून आलंय, की कार वेगाने जात होती, त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला.दरम्यान, या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक लोक रस्ते सुरक्षा उपायांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp