Chhaava Movie : ट्रेलरनंतर वादात सापडलेला 'छावा' चित्रपट प्रदर्शीत करण्यासाठी मंत्री सामंतांनी यांनी ठेवली 'ही' अट

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवावा असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उदय सामंत यांनी 'एक्स' पोस्टवर नेमकं काय म्हटलं?

point

'छावा' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे वाद होणार?

Chhava Controversy : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत  असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता असताना, मंत्री उदय सामंत यांनी विकी कौशलचा आगामी चित्रपट 'छावा' प्रदर्शित होण्यापूर्वी तज्ञांना दाखवावा अशी मागणी केली आहे.

चित्रपटातून संभाजी महाराजांचं जीवनचरित्र दाखवण्याच्या या प्रयत्नाबद्दल उदय सामंत यांनी दिग्दर्शकाचं कौतुक केलं. तसंच त्यांनी असंही म्हटलं आहे की, जर अशा चित्रपटात 'आक्षेपार्ह' दृश्यं असतील तर त्यावर टीका होऊ शकते.

हे ही वाचा >> Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय 14 वर्ष होणार? अजित पवार म्हणाले याच अधिवेशनात अमित शाह...

उदय सामंत यांनी या चित्रपटावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांबद्दल सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आहे. "धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!"
 

दरम्यान, यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. "मी त्यांना इतिहासकारांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोणत्याही चुका दुरुस्त करता येतील आणि ही महत्त्वाची कथा जगभरातील प्रेक्षकांना प्रामाणिकपणे सांगता येईल याची खात्री करता येईल असं ते म्हणाले. 

हे ही वाचा >> GBS Disease : राज्यात GBS मुळे पहिला मृत्यू? रुग्णांची संख्याही वाढली, धोका वाढला...

छत्रपती संभाजी महाराजांच्या कथेवर आधारित 'छावा' हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात विकी कौशल त्यांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना येसूबाईच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्यापूर्वी निर्मात्यांना काही बदल करावे लागतील अशी शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp