Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक घेणार जनता दरबादर, शिवसेना भाजपमधील धुसफूस वाढणार?

मुंबई तक

Maharashtra News: ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गणेश नाईक यांच्या कार्यक्रमाचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या प्रभावाला थेट आव्हान दिलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गणेश नाईकांचा जनता दरबार, सेना-भाजप वाद वाढणार?

point

बालेकिल्ल्यात जनता दरबार, भाजप शिंदेंना डिवचणार?

point

गणेश नाईक, नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?

Thane News: गेल्या काही दिवसांपासून भाजप मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. काही घटनांमध्ये तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप थेट आमनेसामने आलेले दिसले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे. वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक आज ठाण्यात जनतादरबार घेणार आहेत. ठाणे म्हणजे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आता थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच महायुतीतली धुसफूस बाहेर येतेय अशी चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गणेश नाईक यांच्या कार्यक्रमाचे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या प्रभावाला थेट आव्हान दिलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : "मला हलक्यात घेऊ नका..." या शिंदेंच्या वक्तव्यावर दादांची प्रतिक्रिया, एकच हशा पिकला

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. शुक्रवारी शिंदे यांच्या 'मला हलक्यात घेऊ नका' या वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली होती. ज्यांनी मला हलकं घेतलं ते सत्तेबाहेर आहेत असा टोलाही शिंदेंनी मारला होता. हा इशारा कुणासाठी आहे असा सवाल केल्यावर, 'ज्यांना समजायचा घ्यायचं त्यांनी समजून घ्या.' असं शिंदे म्हणाले.

गणेश नाईक यांनी 1990 च्या दशकात राज्यात 'जनता दरबार' ही संकल्पना सुरू केली होती. त्याअंतर्गत तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता आणि प्रशासन यांना समोरासमोर बसवून काम केलं जातं. 3 फेब्रुवारी रोजी नाईक यांनी ठाणे नवी मुंबई, वाशीमध्ये आणि 21  फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यात 'जनता दरबार'ला संबोधित केलं. यापूर्वी, अशा कार्यक्रमाच्या राजकीय परिणामांबद्दल विचारलं असता, नाईक म्हणाले होते 'जनता दरबार'चा एकमेव उद्देश लोकांच्या तक्रारींचं निराकरण करणं हाच आहे.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून...", माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल करत आव्हाड काय म्हणाले?

दुसरीकडे या कार्यक्रमाबद्दल बोलताना, शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "जेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यात येतात तेव्हा हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे काम करण्यासाठी येतात. माझ्यासारखे खासदार आनंदआश्रमात बसतात आणि 400-500 लोक येतात आणि आम्ही अधिकाऱ्यांना बोलावतो." त्यालाच जनता न्यायालय असंही म्हणतात. यासाठी तुम्हाला राजवाडा बांधण्याची गरज नाही. ठाण्याचे माजी महापौर म्हस्के म्हणाले की, जेव्हा लोक त्यांच्या समस्या घेऊन राजकीय नेत्यांना भेटायला येतात, तेव्हा आपण आक्षेप का घ्यावा.

हे वाचलं का?

    follow whatsapp