Jitendra Awhad : "...नाहीतर मी तुला झोडणार, तुझी लायकी काय?", राहुल सोलापूरकरला जितेंद्र आव्हाड यांचा थेट इशारा

मुंबई तक

राहुल सोलापूरकरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलेला एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवराय आणि भिमरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

point

राहुल सोलापूरकरला जितेंद्र आव्हाड यांचा थेट इशारा

point

"कुणी नाही मारलं तरी, मी तुला झोडणार"

Jitendra Awhad : अभिनेता राहुल सोलापूरकरवर जितेंद्र आव्हाड यांनी तुफान हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केलेला एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. यावरुन आता पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही वक्तव्यांवरुन राहुल सोलापूरकरला थेट इशारा दिला आहे.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : ."..तर हिमालयात जाऊन साधूसंत व्हा आणि वाल्मिकलाही माफ करा"; आव्हाड सुरेश धसांवर बरसले

"मनुवाद्यांच्या डोक्यातलं चातुर्वर्णाचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, ज्ञानी असेल तर तो ब्राह्मणच असतो असं सोलापूरकर म्हणतोय. त्याने बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकलं. याच्या कानशि‍लात जाळ काढला की, याच्यातला मनुवाद बरोबर जागा होईल. काय गरज आहे, शिवाजी महाराजांबद्दल आणि बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाज विष कालवायची. सोलापूरकर तुम्ही बाबासाहेबांना अरेतुरे करतात? अरे तो आमचा बाप आहे, तू म्हणशील का बाप? गप आपले दोन्ही वक्तव्य मागे घे. तू जिथे असशील, तुला कुणीही नाही मारलं तरी मी तुला मारणार. बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. तुझी लायकी काय? एका पिक्चरमध्ये रोल केला तर तू अमिताभ बच्चन झाला की काय?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा >> Suraj Chavan: "...तरच धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल", संतोष देशमुख हत्याप्रकरणी सूरज चव्हाण यांचं मोठं विधान!

जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एका पोस्ट करत, "राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ  बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !!"   

हे वाचलं का?

    follow whatsapp