Mumbai Central Railway : लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, मोठा आवाज झाल्यानं हादरले प्रवासी

मुंबई तक

लोकलमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे आवाज झाला, त्यामुळे घबराट पसरली. स्फोटामुळे डब्ब्यात धूर झाला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कळवा स्थानकाजवळ लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट

point

मोबाईलचा स्फोट झाल्यानं हादरले प्रवासी

ठाण्यात लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका अज्ञात प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये काही काळ गोंधळ उडाला. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती वृत्तसंस्थेला दिली आहे. याप्रकरणी माहिती देताना ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी म्हणाले की, सोमवारी रात्री 8:12 वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला.

हे ही वाचा >> Mahayuti : मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या, शिंदेंचे मंत्री महायुतीत नाराज?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ने दिलेल्या माहितीनुसारया घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. मोबाईलच्या स्फोटामुळे डब्यात काहीसा धूरही पसरला होता. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला.

लोकलमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे आवाज झाला, त्यामुळे घबराट पसरली. स्फोटामुळे डब्ब्यात धूर झाला होता. त्यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दरवाजाकडे धावले. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.

हे ही वाचा >> 'शिंदे साहेब बाळासाहेबांनंतर तुम्हीच शिवसेना घडवली', आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या!

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला तिची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीमधील काही बिघाडामुळे स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp