Nanded : मुख्यध्यापकाकडून गुंगीचं औषध देत अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची...

मुंबई तक

कुटुंबाला हे कळताच कुटुंबाने तक्रार केली आणि आरोपी मुख्याध्यापक राजू सिंह चौहानविरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर तामसामध्ये कडकडीत बंद.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थीनीवर बलात्कार, नांदेड संतापाने पेटलं

point

नराधम मुख्यध्यापकाने गुंगीचं औषध पाजून केले अत्याचार

point

अत्याचार केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Nanded Crime News : नांदेडमध्ये गुरू शिष्याच्या नात्याला कलंकित करणारी घटना घडली. मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Bhaskar Jadhav : "जायचं त्यांना जाऊद्या म्हणण्यापेक्षा...", साळवींच्या निर्णयानंतर भास्कर जाधवांचा स्वपक्षीयांना सल्ला

तामसा शहरातील एका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीला गुंगीचं औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तहसीलमधील तामसा गावात घडली. तसंच बलात्कार केल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने मुलीला धमकी देत सांगितलं की, जर या प्रकरणाबद्दल कुणाला सांगितलं तर जीवे मारुन टाकेन. तसंच मी तुझा अश्लील व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हायरल करेन अशीही धमकी दिली. त्यानंतर विद्यार्थिनीने गर्भपातही करून घेतला. 

दरम्यान, कुटुंबाला हे कळताच कुटुंबाने तक्रार केली आणि आरोपी मुख्याध्यापक राजू सिंह चौहानविरुद्ध पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तामसा शहरात ही बातमी पसरताच सर्व सामाजिक संघटना आणि नागरिक तामसा पोलीस ठाण्यात जमले. तसंच लोकांनी आज तामसा शहरात बंद ठेवून निषेध केला आहे. 

हे ही वाचा >> Rajan Salvi : शिवसेनेत प्रवेशापूर्वी शिंदेंनी वाद मिटवला, सामंत आणि साळवींना एकाच गाडीतून घरी पाठवलं

आरोपी मुख्याध्यापकाला लवकरात लवकर अटक करून आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. डीवायएसपी शफाकत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या आरोपी फरार असून, ही शाळा उद्धव गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची असल्याची माहितीही समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp