Buldhana : शेतात 10 गुंठ्यावर अफूची लागवड, पोलीस हादरले, बुलढाण्यात मोठी कारवाई, कोट्यवधींचा...
पोलीस अधिकारी अशोक लांडे म्हणाले की, आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की संतोष सानप नावाच्या व्यक्तीने त्याच्या शेतात 8 पोती अफू पेरली आहे. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि तिथं अफूची रोपं आढळली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शेतात अफूची लागवड, पोलिसांची कारवाई

शेतात भल्या मोठ्या पडद्यामागे होते अफूचे रोप

गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई
बुलढाणा : झका खान : गांजा लागवड करणाऱ्यांवर अनेक ठिकाणी कारवाई झाल्याचं आपण ऐकतो. मात्र, बुलढाण्यात गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत थेट अफूची शेती करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बुलढाणा पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंधेरा गावातील एका शेतात अफूची लागवड होत असल्याची माहिती मिळाली. 22 फेब्रुवारीच्या पहाटे गुन्हे शाखेचं पथक शेतात पोहोचलं. शेताच्या एका भागावर मोठा जाळीचा पडदा बसवण्यात आला होता. जेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी तो पडदा काढला तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
हे ही वाचा >>Nashik : आधी चुकीच्या दिशेना आलेला ट्रक, नंतर ब्रेक फेल झालेला ट्रक... दोन अपघातात 4 जण ठार, 7 गंभीर
शेतात तब्बल 8 ते 10 गुंठे जमिनीवर (11 हजार चौरस फूट) शेकडो अफूची रोपं लावलेली आढळली. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती तात्काळ देण्यात आली. पोलीस अधिकारी अशोक लांडे म्हणाले की, आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती की संतोष सानप नावाच्या व्यक्तीने त्याच्या शेतात 8 पोती अफू पेरली आहे. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि तिथं अफूची रोपं आढळली.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, आम्ही कृषी अधिकाऱ्यांकडेही चौकशी केली. ही रोपं अफूची रोपं आहेत की नाही, याचीही खात्री केली. रोपांचं वजन 1500 क्विंटलपेक्षाही जास्त भरलं आहे. त्याची बाजारात किंमत 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.\
हे ही वाचा >>iPhone 16e : भारतात तयार झालेला iPhone 16e आता जगभरात विकला जाणार, किंमत किती? फिचर्स कोणते?
या प्रकरणी संतोष सानप नावाच्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध एनपीडीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.