Saif Ali Khan Discharge : सैफ अली खान घरी पोहोचला, गाडीतून उतरून रूबाबात चालत गेला

मुंबई तक

16 जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला झाल्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी पावलं उचलली जात आहेत. सैफच्या घराच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज

point

सैफ बाहेर येताच रुग्णालयाबाहेर काय घडलं?

अभिनेता सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सैफला घेण्यासाठी त्याची पत्नी करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्या होत्या. 16 जानेवारीच्या रात्री चाकूहल्ला झाल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर सैफला लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. 16 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता एका चोराने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. चोराशी झालेल्या झटापटीत सैफ जखमी झाला होता. सैफवर तब्बल 6 वार करण्यात आले होते, त्यातले 2 वार खोलवर गेले होते.

हे ही वाचा >> Walmik Karad CCTV Video : खंडणी मागितली त्यादिवशी सगळे आरोपी एकत्र? CCTV ने उडवली खळबळ

जखमी सैफ अली खाऊवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफच्या पाठीवर वार केल्यानंतर तुटलेला 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा सैफच्या मणक्याजवळ अडकलेला होता. डॉक्टरांनी तो  शस्त्रक्रिया करत काढूला. लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी सांगितलं होतं की, सैफ अली खानच्या शरीरावर चार खोल जखमा होत्या. ज्यावर उपचार करण्यात आले आहेत. डॉ. नीना जैन आणि त्यांच्या प्लास्टिक सर्जरी टीमने सैफच्या मानेवर आणि हाताच्या जखमांवर उपचार केले आहेत. सैफच्या पाठीच्या शस्त्रक्रियेत संसर्गाचा धोका असल्यानं, अजूनही काही आठवडे हालचाल न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा >>Punjab 95 Release Postpone : दिलजीतचा 'पंजाब 95' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रिलीज डेट पुढे ढकलली

दरम्यान, 16 जानेवारीला सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला झाल्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी पावलं उचलली जात आहेत. सैफच्या घराच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. सैफ अली खान सद्गुरु शरण नावाच्या इमारतीच्या 7 व्या मजल्यावर राहतो. सैफच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. घराच्या खिडक्यांमध्ये ग्रिल बसवले जात आहेत. तसंच, करीना कपूर खानचे अंगरक्षक आणि मुंबई पोलिस इमारतीबाहेर उपस्थित आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp