Salman Rushdie यांनी जीवघेण्या हल्ल्यात एक डोळा गमावला, एक हातही निकामी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आणि जगप्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी यांच्यावर काही महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे आणि त्यांचा एक हात निकामी झाला आहे. द गार्डियनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दी यांचं व्याख्यान सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

नेमकी काय घडली होती घटना?

१२ ऑगस्टला सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले आहेत. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले. लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला. बफेलोजवळ चौटोका या ठिकाणी सलमान रश्दी हे व्याख्यान देण्यासाठी गेले होते. तिथे स्टेजवर बसलेले असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेत सलमान रश्दी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आली आहे. त्यांचा एक हात अधू झाला आहे तर एक डोळा निकामी झाला आहे.

सलमान रश्दी यांचे एजंट काय म्हणाले?

सलमान रश्दी यांचा एजंट अँड्र्यू वायली याने एल पेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सलमान रश्दी यांच्या जखमा खोल आहेत. त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. घशात तीन गंभीर जखमा होत्या. हातातील नसा कापल्या गेल्याने एक हात निकामी झाला आहे. त्यांच्या छातीवर आणि धडावर 15 जखमा होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे सलमान रश्दी वादात

द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला होता. १९८० च्या दशकात हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. मुस्लिम समाजात या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. सलमान रश्दी हे जागतिक किर्तीचे लेखक आहेत. त्यांना बुकर या सर्वोच्च सन्मानानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

इराणमधून सलमान रश्दींविरोधात काय फतवा निघाला होता?

द सॅटेनिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिल्यानंतर जो वाद सलमान रश्दींविरोधात झाला त्यानंतर इराणहून त्यांच्या विरोधात फतवा निघाला. हा फतवा साधासुधा नव्हता. सलमान रश्दी यांना जो ठार मारेल त्याला ३० लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाईल असा फतवा होता. इराण गणतंत्राचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खुमैनी यांनी सलमान रश्दींच्या विरोधात हा फतवा काढला होता. मात्र नंतर इराण सरकारने हा त्यांचा व्यक्तिगत मामला आहे असं म्हणत हात झटकले होते. यानंतर २०१२ मध्येही सलमान रश्दींना ठार करण्यासाठी इराणच्या एका धार्मिक संघटनेने फतवा काढला. या फतव्यात सलमान रश्दींना ठार मारणाऱ्यास ३३ लाख डॉलर्सचं बक्षीस दिलं जाई असं जाहीर करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

सलमान रश्दींवर हल्ला, हल्लेखोर अटकेत

सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक आहेत.

ADVERTISEMENT

१२ ऑगस्टला अमेरिकेल्या न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानादरम्यान त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकू हल्ला केला

सलमान रश्दींच्या विरोधात इराणमधून फतवा काढण्यात आला आहे

सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणारा २४ वर्षीय आरोपी हादी मतार हा असून त्याला न्यूजर्सीतल्या कारागृहात ठेवण्यात आलं आहे

सलमान रश्दी यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्यांना हेलिकॉप्टरने रूग्णालयात पाठवण्यात आलं

    follow whatsapp

    ADVERTISEMENT