Maharashtra Weather Update : धुरकट वातावरण, थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना तर पावसाचा इशारा?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा!

point

थंडीची चाहूल लागताच अवकाळी पाऊस! नेमकं कारण काय?

point

पुढचे 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक भागातील तापमानात कमालीची घट होताना दिसत आहे. अशातच आता काही जिल्ह्यांवर अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय. यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावली. जास्त दिवस लांबलेल्या पावसामुळे थंडीची चाहूल देखील उशीराने लागली आहे. पण, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हा इशारा कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा!

IMD Weather Update in these Districts: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी पुढचे 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. या ढगाळ वातावरणा दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : Raj Thackeray : अधिकाऱ्यांना काही कळतं की नाही? उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?

त्याचवेळी, उद्यापासून (गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024) कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Sharad Pawar : "भूजबळांनी मर्यादा ओलांडल्या...", शरद पवारांनी दंड थोपटले, येवल्यात तुफान बरसले

थंडीची चाहूल लागताच अवकाळी पाऊस! नेमकं कारण काय?

दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच समुद्रावरून येणारं बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असून त्यामुळे इथे ढगाळ वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. या स्थितीमुळे राज्याच्या सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT