Karnataka : ST Bus चालकाला कर्नाटकमध्ये काळं फासत धक्काबुक्की, कोल्हापुरातून कर्नाटकला जाणाऱ्या बस बंद
बस चालक बंगळुरूहून मुंबईकडे येत असताना कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवली. तुला कन्नड बोलता येते का? असं विचारत कार्यकर्त्यांनी चालकाला काळं फासलं आणि बसला काळं फासलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा एकदा पेटला

कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी

एसटी चालकाला "कन्नड भाषा येते का?" विचारत मारहाण
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी बस चालक भास्कर जाधव यांना रोखून कन्नड बोलता येते का असं विचारत अपमानास्पद वागणूक देऊन त्रास दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना काल रात्री 9 वाजता घडली. त्यानंतर आज सकाळपासून कोल्हापूर एसटी बस स्थानकावरून कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे. आज सकाळपासून एकही बस कर्नाटकसाठी सोडण्यात आलेली नाही.
हे ही वाचा >>Jalna : पत्र्याच्या आडोशाखाली झोपलेल्या मजूरांवर रात्री वाळूचा ट्रक रिकामा केला, 5 मजूरांचा दबून मृत्यू
बस चालक बंगळुरूहून मुंबईकडे येत असताना कन्नड वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवली. तुला कन्नड बोलता येते का? असं विचारत कार्यकर्त्यांनी चालकाला काळं फासलं आणि बसला काळं फासलं. यावेळी चालकाना मारहाण करत बसचं नुकसान केल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठी भाषिकांवर अत्याचार होत असल्याचं समोर आलंय. आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही कोल्हापूर बस स्थानकाबाहेर कर्नाटक राज्यातील एसटी बसवर भगवा झेंडा लावून या घटनेचा निषेध केला आहे.
हे ही वाचा >> Suresh Dhas : "मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार की...", धनंजय देशमुखांच्या भेटीनंतर धस काय म्हणाले?
कोल्हापूर बस डेपोमधील एसटी बस कर्मचाऱ्यांनी बेळगाव-कर्नाटकला जाणाऱ्या सर्व राज्य परिवहन बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत.