Thane Crime News : महिलांना गोड बोलण्यात अडकवून दागिने चोरायचे, गुजरातच्या दोघांना अटक
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतरांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार शोध घेतल्यानंतर, पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ठाण्यातून महिलांचे दागिने चोरणारे निघाला गुजरातचा

ठाणे पोलिसांनी कसा काढला आरोपींचा माग

महिलांना गोड बोलून जाळ्यात अडकवायचे
ठाणे आणि मुंबईतील अनेक महिलांचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अहमदाबादमधून दोघांना अटक केली आहे.पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितली, त्यानुसार, 4 फेब्रुवारीला भाईंदर परिसरात एका 60 वर्षीय महिलेच्या दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलीस करत होते, तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला.
हे ही वाचा >>Buldhana : शेतात 10 गुंठ्यावर अफूची लागवड, पोलीस हादरले, बुलढाण्यात मोठी कारवाई, कोट्यवधींचा...
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी सांगितले की, ही महिला भाईंदर रेल्वे स्थानकावरून घरी जात असताना आरोपीने तिला रस्त्यातच पकडलं. यानंतर, गप्पा मारण्याचा बहाणा करुन 80,000 रुपयांचे दागिने चोरले. यानंतर, नवघर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतरांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार शोध घेतल्यानंतर, पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी आहेत. गुजरात पोलिसांच्या मदतीने, अहमदाबादच्या सरदार नगर भागातून 23 आणि 45 वर्षांच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी त्याला अटक करण्यात आली.
हे ही वाचा >>IND vs PAK CT 2025: भारत-पाकिस्तान संघात कुणाची ताकद जास्त, कोण पडणार भारी? काय आहेत एक्स फॅक्टर?
चौकशीदरम्यान, त्याच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये असेच 10 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं. सध्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.