Nagpur : शेताकडे जात असताना वाघाचा हल्ला, मानेला धरून फरफटत नेलं, शेतकऱ्याचा करूण अंत

मुंबई तक

दाट झाडीमधून एक वाघ बाहेर आला आणि त्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. वाघानं त्या शेतकऱ्याच्या थेट नरडीचा घोट घेतला आणि मानेला धरून सुमारे 50 फूट ओढत नेलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूरमध्ये यावर्षी वाघाच्या हल्ल्यात दुसरा मृत्यू

point

शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

point

वाघाने शेतकऱ्याला 50 फूट फरफटत नेलं

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी शेताकडे जात असताना झुडपात दबा धरून बसलेल्या एका वाघानं थेट शेतकऱ्यावर हल्ला केला.यावेळा वाघानं शेतकऱ्याच्या गळ्याला धरून दूरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेमुळे नागपूरमध्ये या वर्षी वाघाच्या हल्ल्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

हे ही वाचा >> "गुंडगिरी दहशत संपवण्यासाठीच मी राजकारणात...", काळे झेंडे दाखवल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडे समर्थकांना दिला इशारा

पारसेवनी तालुक्यामध्ये कोंढासावली गावाजवळ ही घटना घडली. शेतकरी दशरथ धोटे त्यांच्या गुरं चारण्यासाठी जात होते. प्रत्यक्षदर्शींनी  सांगितल्यानुसार, दशरथ धोटे शेताकडे जात असतानाच जवळच असलेल्या दाट झाडीमधून एक वाघ बाहेर आला आणि त्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. वाघानं त्या शेतकऱ्याच्या थेट नरडीचा घोट घेतला आणि मानेला धरून सुमारे 50 फूट ओढत नेलं.

धोटे यांचं ओरडणं ऐकून त्यांचा मुलगा आणि इतर गावकरी त्यांच्या मदतीला धावले, पण तोपर्यंत वाघाने त्यांना गंभीर जखमी केलं होतं. गावकऱ्यांनी जोरजोरात आवाज केल्यावर वाघ जंगलाकडे पळून गेला. तोपर्यंत शेतकरी दशरथ धोटे यांचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा >> Amit Shah : "राष्ट्रासमोर दोन संकल्प ठेवले आहेत, या देशाला 2047 पर्यंत...", पुण्यात अमित शाहांचं सर्वात मोठं विधान!

 

दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि तपास सुरू केला. गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, आजूबाजूच्या जंगलांमध्ये वाघांच्या वाढत्या हालचालींवर लक्ष ठेवलं जात असून, स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या वर्षी नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात झालेला हा दुसरा मृत्यू असल्याचे लोकांचं म्हणणं आहे. यापूर्वी, 12 जानेवारी रोजी आमगाव गावात सहदेव सूर्यवंशी नावाच्या माणसाला वाघाने मारले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp